Video - देव तारी त्याला कोण मारी! भरधाव वेगाने जाणाऱ्या २ बसमध्ये अडकला तरुण अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 14:47 IST2025-01-26T14:47:00+5:302025-01-26T14:47:41+5:30
बसचा वेग थोडा कमी झालेला असताना, भरत नावाचा एक तरुण बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता.

Video - देव तारी त्याला कोण मारी! भरधाव वेगाने जाणाऱ्या २ बसमध्ये अडकला तरुण अन्...
तामिळनाडूतील तंजावर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे दोन हाय-स्पीड बसमध्ये अडकल्यानंतर एक तरुण चमत्कारिकरित्या बचावला. ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा तरुण कसा वाचला? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
एक खासगी बस थमारनकोट्टईहून पट्टुकोट्टईला जात होती. याच दरम्यान, बसचा वेग थोडा कमी झालेला असताना, भरत नावाचा एक तरुण बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच वेळी एक सरकारी बस एका खासगी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात डावीकडे गेली.
चमत्कारः दो बसों के बीच फंसा युवक, मौत को दी मात। https://t.co/mTJ84e9tQjpic.twitter.com/xu9SMorQbz
— Avakash kumar (@ak_hindu3) January 24, 2025
भरत त्यामुळे दोन बसमध्ये अडकला आणि त्याचा तोल गेला. अशा परिस्थितीत तो जमिनीवर पडला आणि चमत्कारिकरित्या बचावला. हा अपघात खासगी बसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता आणि आता तो व्हायरल झाला आहे. जर बस थोडीशीही हलली असती तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता.
व्हिडिओमध्ये भरत पांढरा शर्ट घालून रस्त्याच्या कडेला उभा असल्याचं दिसून येतं. दरम्यान, एका खासगी बसचा वेग कमी झाला आणि भरत त्यात चढण्यासाठी पुढे गेला, पण त्याच दरम्यान मागून एक सरकारी बस आली. ज्यामुळे भरत एका सरकारी बसला धडकतो. खाजगी बस आणि सरकारी बसमध्ये खूप कमी जागा होती. त्यामुळे भरत जमिनीवर पडला आणि चमत्कारिकरित्या बचावला.