"साहेब, मला वाचवा! माझ्या पत्नीचे ५ पती; तिने सर्वांना फसवलं, आता माझी पाळी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 04:05 PM2024-07-10T16:05:44+5:302024-07-10T16:13:43+5:30

मध्य प्रदेशातील छतरपूर एसपी कार्यालयात एक अनोखा प्रकार समोर आला आहे.

man has given complaint application to chhatarpur sp saying that his wife has many husbands | "साहेब, मला वाचवा! माझ्या पत्नीचे ५ पती; तिने सर्वांना फसवलं, आता माझी पाळी..."

फोटो - आजतक

मध्य प्रदेशातील छतरपूर एसपी कार्यालयात एक अनोखा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने तक्रार दिली आणि सांगितलं की, "पत्नीचे अनेक पती आहेत आणि तिने या सर्वांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात आपल्या जाळ्यात फसवलं आहे आहे. आता माझी पाळी आहे."

फूलचंद कुशवाह असं या व्यक्तीचं नाव असून याने सांगितलं की, विनीता उर्फ ​​​​सलमा हिने मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून २०११ मध्ये माझ्याशी लग्न केलं. लग्नानंतर विनीता ब्युटी पार्लर चालवत असे आणि त्या व्यवसायाच्या नावाखाली तिचे अनेक लोकांशी संबंध असल्याचं उघड झालं आहे.

फूलचंद हा आपल्या पत्नीच्या ब्युटी पार्लरशी संबंधित व्यवसायाच्या विरोधात आहे. त्यामुळे पत्नीने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन छतरपूरमध्ये त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली आहे. "माझी पत्नी विनीताने २००० साली रामवीर तोमरसोबत लग्न केलं."

"रामवीर तोमरची संपत्ती बळकावल्यानंतर २००६ मध्ये तिने तिचं नाव आणि धर्म बदलून सलमा असं केलं आणि भुरे खान नावाच्या व्यक्तीशी निकाह केला. भुरे खानची मालमत्ता बळकावल्यानंतर, ती पुन्हा विनीता सिंह बनली आणि २००८ साली तिने पुन्हा हिंदू बनून टिकमगड येथील अजय खरायाशी लग्न केलं."

"२००९ मध्ये छतरपूर येथील जगदीश प्रसाद सिंह याच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर २०११ मध्ये माझ्याशी लग्न केलं आहे" अशी माहिती फूलचंद कुशवाह याने दिली आहे. तसेच आता ती पतीला आपल्या प्रियकराच्या मदतीने जीवे मारण्याची धमकी देत आहे. असंही फूलचंदने म्हटलं आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: man has given complaint application to chhatarpur sp saying that his wife has many husbands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.