शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हा कसला बाप?... मित्राला 'गिफ्ट' दिली स्वतःची मुलगी, केला सामूहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 19:14 IST

बलात्कारानंतर सदर मुलीला 18 तास कोंडून ठेवण्यात आले. सोमवारी तिला बाहेर सोडण्यात आले.

सीतापूर - जम्मू कश्मीरमधील कथुआत आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली असतानाच उत्तरप्रदेशमधील एका व्यक्तीने आपल्या मुलीला मित्रांना गिप्ट केलं आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

लखनऊ पासून 70 किमी दूर असलेल्या सीतापूरमध्ये ही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 15 एप्रिल रोजी  कमलापूर येथील जत्रेतून घरी आल्यानंतर मुलीच्या वडिलाने त्याचा मित्र, हिस्ट्रीशीटर मान सिंहला घरी बोलावले. त्यानंतर त्याच्या 35 वर्षीय मुलीला मान सिंहबरोबर बाइकवरून जायला सांगितले. मान सिंह तिला घेऊन मेराज नावाच्या मित्राच्या घरी गेला. त्यानंतर या दोघांसह मुलीच्या वडिलानेही तिच्यावर बलात्कार केला. 

बलात्कारानंतर सदर मुलीला मेराजच्या घरी 18 तास कोंडून ठेवण्यात आले. सोमवारी तिला बाहेर सोडण्यात आले. त्यामुळे घरी आल्यावर या मुलीने तिच्या आईला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने तिने पोलिसात गुन्हा दाखल केला, असं पोलिसांनी सांगितलं.  पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन जण फरार असून यामध्ये पीडितेच्या वडिलांचा समावेश आहे. 

पीडित महिलेचा विवाह 16 वर्षापूर्वीच झाला होता. लग्नाला दोन वर्ष झाल्यावर पतीशी भांडण झालं म्हणून ती माहेरी निघून आली होती. नोव्हेंबर 2017 मध्येही या मुलीने तिच्या वडिलांवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर तिच्या वडिलाला गावातून हाकलून देण्यात आले होते. पोलिसांनी त्याला अटक केली होती. फेब्रुवारीमध्ये पिडीत महिलेचा पिता जमानतवर बाहेर आला आहे.  2017 मध्ये झालेल्या घटनेनंतर पिडीत महिला आपल्या 14 वर्षाच्या मुलाबरोबर वेगळी राहत आहे. 

बलात्कारांत वाढ  - भारतात पंधरा मिनिटाला एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार बालकांवरील अत्याचारांच्या प्रकरणात २०१५ पेक्षा २०१६मध्ये ८२ टक्के वाढ झाली. अत्याचार होण्याचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशात आहे. देशातील एकूण गुन्ह्यांपैकी १५ टक्के गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये घडतात. गुजरातमधील सुरतमध्येही ११ दिवसांपूर्वी एका बालिकेचा मृतदेह मिळाला होता. तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. अद्याप तिची ओळख पटलेली नाही.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस