शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

...अन् अंत्यसंस्कारावेळी 'मृत' मुलगा उठला, पाणी मागू लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 4:12 PM

लखनऊमधील धक्कादायक प्रकार

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या राजधानीत एक धक्कादायक प्रकार घडला. एका खासगी रुग्णालयानं तरुणाला मृत घोषित केलं. यानंतर त्याला घरी नेण्यात आलं. चार तासांनंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी शोकाकुल वातावरण असताना अचानक मृत तरुणानं डोळे उघडले आणि त्यानं इशाऱ्यानं पाणी मागितलं. यानंतर तो कपभर पाणी प्यायला. यानंतर सगळ्यांना एकच धक्का बसला. उपस्थित नातेवाईकांनी त्याला बलरामपूरमधील रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अमिनाबादचे रहिवासी असलेल्या गुरु प्रसाद यांचा मुलगा संजयची (वय २८ वर्षे) प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली. त्यामुळे त्याला दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला कावीळ झाल्याचं सांगितलं. चार-पाच दिवस त्याच्यावर उपचार झाले. पण काहीच उपयोग झाला नाही. शनिवारी त्याला नक्खासमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 'संजयला सकाळी सहाच्या सुमारास मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर आम्ही त्याचा मृतदेह घेऊन घरी आलो', असं त्याच्या मावशीच्या मुलीनं सांगितलं. सकाळी १० वाजता संजयच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. त्यावेळी त्याच्या शरीरानं हालचाल केली. त्यानं डोळे उघडले. पाण्यासाठी इशारा केला आणि एक कप पाणीदेखील प्यायला. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी बलरामपूरमधील रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.