शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

घरातील महिलांचे दागिने विकून 70 बोटी विकत घेतल्या अन् महाकुंभात केली 30 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:07 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी विधानसभेत सांगितली या अवलियाची कहाणी...

Mahakumbh 2025 : अंगात जिद्द असेल, तर यशाची शिखरे पादांक्रत करण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभातून अनेक यशोगाथा समोर येत आहे, ज्या ऐकून तुम्हीदेखील अवाक व्हाल. या महाकुंभ सोहळ्यात देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावली.

महाकुंभ फक्त एक धार्मिक आयोजन नव्हते, तर अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन होते. महाकुंभात युपीसह देशभरातील अनेकांनी लहान-मोठे व्यवसाय करुन हजारो-लाखोंची कमाई केली. काहींनी तर कोट्यवधी रुपये कमावले. सध्या एका अशा व्यक्तीची जोरदार चर्चा होत आहे, ज्याने महाकुंभात 45 दिवस बोट चालवून तब्बल 30 कोटी रुपये कमावले. सीएम योगी आदित्यनाथ यांनी स्वतः विधानसभेत या व्यक्तीची यशोगाथा सर्वांसमोर मांडली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी विधानसभेत अनेकांची उदाहरणे दिली, ज्यांना या महाकुंभामुळे खूप मोठा आर्थिक लाभ झाला. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार, या महाकुंभाने त्रिवेणीच्या काठावर वसलेल्या अराइल गावात राहणाऱ्या पिंटू मेहरा यांचे आयुष्यच बदलून गेले. पिंटू यांनी महाकुंभ सुरू होण्यापूर्वी घरातील महिलांचे दागिने विकून आणि जमीन गहान ठेवून 70 बोटी विकत घेतल्या होत्या. 

पिंटू सांगतात की, नौकाविहार हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. यापूर्वी झालेल्या अर्धकुंभात प्रचंड गर्दी झाली होती, त्यामुळे यंदाही गर्दी होणार, असा त्यांना अंदाज आला होता. यामुळेच त्यांनी आपल्या कुटुंबाचे सर्वस्व पणाला लावले आणि 70 बोटी विकत घेतल्या. त्यांच्या कुटुंबात शंभरहून अधिक लोक असून, या सर्वांना त्यांनी कामावा लावले. महाकुंभ 45 दिवस चालला आणि या काळात पिंटू यांच्या कुटुंबाने बोट चालवून तब्बल 30 कोटी रुपयांची कमाई केली. या देदिप्यमान यशामुळे पिंटू यांची सर्वत्र चर्चा होत आहे.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी