शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

धक्कादायक! चार हजारांच्या बिलावरून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून मारहाण; रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 11:53 AM

पोलिसांकडून एफआयआर दाखल; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू

अलिगढ: रुग्णालयाचं बिल न दिल्यानं कर्मचाऱ्यांकडून रुग्णाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना अलिगढमध्ये घडली आहे. यानंतर रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. सुलतान खान असं मृत पावलेल्या रुग्णाचं नाव असून तो अलिगढमधील इग्लास गावचे रहिवासी होते. सुलतान खान त्यांच्या काही नातेवाईकांसह एका खासगी रुग्णालयात गेले होते. मात्र तेथील उपचार महाग असल्यानं त्यांनी तिथून निघण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णालयात आल्याबद्दल प्रशासनानं त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, अशी माहिती खान यांच्या कुटुंबीयांनी दिली. याबद्दल संबंधित रुग्णालयाकडे विचारणा केली असता, त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केलं असून त्यात रुग्ण, त्याचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेली झटापट दिसत आहे. 'क्वार्सी पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेशदेखील दिले आहेत. संबंधित रुग्णाचा शवविच्छेदन आल्यानंतर त्याला झालेल्या जखमांचं स्वरुप लक्षात येईल. त्यामधून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. यानंतर पुढील तपास केला जाईल,' अशी माहिती अलिगढचे पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी दिली.'सुलतान खान गुरुवारी एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी गेले होते. तिथे त्यांचा बिलावरून वाद झाला. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत खान यांचा मृत्यू झाल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे,' अशी माहिती अभिषेक यांनी सांगितली. कोणतेही उपचार न करता रुग्णालयानं खान यांच्याकडे ४ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.