"लॉकडाउनसंदर्भात विरोधाभास निर्माण करणारे भाष्य करतेय केंद्र सरकार, बैठकीत बोलूही दिलं नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 11:13 PM2020-04-27T23:13:40+5:302020-04-27T23:35:46+5:30

ममता म्हणाल्या, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत रोटेशन सिस्टमचे कारण सांगत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधीच दिली गेली नाही. तसेच गृह मंत्रालयाने दुकाने खुली करण्याचा एक आदेश जारी केला होता. या आदेशात अधिक स्पष्टता असने आवश्यक आहे.

Mamta banerjee says many CM were not allowed to speak in meeting with pm narendra modi sna | "लॉकडाउनसंदर्भात विरोधाभास निर्माण करणारे भाष्य करतेय केंद्र सरकार, बैठकीत बोलूही दिलं नाही"

"लॉकडाउनसंदर्भात विरोधाभास निर्माण करणारे भाष्य करतेय केंद्र सरकार, बैठकीत बोलूही दिलं नाही"

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहेपंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत अनेक मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप ममतांनी केला आहेममता बॅनर्जी म्हणाल्या, संधी मिळाली असती तर आपण अनेक मुद्यांवर प्रश्न उपस्थित करणार होतो

कोलकाता : कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर, आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'केंद्र सरकार विरोधाभास निर्माण करणारे भाष्य करत आहे. एकीकडे केंद्र सरकार सांगते, की लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करा. तर दुसरीकडे दुकाने उघडण्याचा आदेश देत आहे. जर, दुकाने उघडली गेली, तर लॉकडाउनचे पालन कसे होईल? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी सरकारला विचारला आहे. एवढेच नाही, तर या बैठकीत अनेक मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधीच दिली नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

CoronaVirus: पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; जाणून घ्या, कोण काय म्हणाले

ममता म्हणाल्या, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत रोटेशन सिस्टमचे कारण सांगत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधीच दिली गेली नाही. तसेच गृह मंत्रालयाने दुकाने खुली करण्याचा एक आदेश जारी केला होता. या आदेशात अधिक स्पष्टता असने आवश्यक आहे.

बैठकीत बोलू दिले नाही -
ममता म्हणाल्या, संधी मिळाली असती तर आपण अनेक मुद्यांवर प्रश्न उपस्थित करणार होतो. बंगालमध्ये केंद्रीय टीमच्या आवश्यकतेसंदर्भातही आपण प्रश्न उपस्थित केला असता. यासंदर्भात ममतांनी एक निवेदनही जारी केले आहे. यात त्या म्हणतात, 'लॉकडाउनसंदर्भात केंद्र सरकार विरोधाभास निर्माण करणारे भाष्य करत आहे. आमचे लॉकडाउनला समर्थन आहे. मात्र, केंद्र सरकार एकिकडे लॉकडाउनची कठोरपणे अंमलबजावणी करायला सांगत आहे. तर दुसरीकडे दुकाने उघडण्याचा आदेश देत आहे. जर दुकाने उघडली गेली तर लॉकडाउनचे पालन कसे होणा? केंद्राला हे अधिक स्पष्ट करायला हवे.'

याला म्हणतात 'हटके लग्न'! पुढे-मागे पोलीस अन् मधे 'नवरदेव-नवरी', अशी करण्यात आली पाठवणी

'एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आणि तिच्या घरी सुविधा असेल, तर ती स्वतःला होम क्वांरटाइन करू शकते. लाखो लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवले जाऊ शकत नाही. सरकारच्याही काही मर्यादा आहेत,' असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

लयभारी! डोनाल्ड ट्रम्प, जेव्हा स्वतःचीच स्तुती करतात...; विरोधकांवर 'असा' साधला निशाणा

 

Web Title: Mamta banerjee says many CM were not allowed to speak in meeting with pm narendra modi sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.