‘ममता बॅनर्जी या तर पुतनामावशी’  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 04:56 IST2019-02-09T04:55:51+5:302019-02-09T04:56:18+5:30

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी नसून पुतनामावशी आहेत असे वादग्रस्त उद््गार केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काढले आहेत.

 'Mamta Banerjee is Putinamavshi' | ‘ममता बॅनर्जी या तर पुतनामावशी’  

‘ममता बॅनर्जी या तर पुतनामावशी’  

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी नसून पुतनामावशी आहेत असे वादग्रस्त उद््गार केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काढले आहेत. ते म्हणाले की, ममतांनी पश्चिम बंगालला उद््ध्वस्त केले. त्यांची झाशीच्या राणीच्या तुलना करणे हा त्या राणीचा अपमान ठरेल. रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांना पाठिंबा देणारी, हिंदूंनाच रोखू पाहाणारी महिला झाशीची राणी होऊच शकत नाही. ममता या झाशीची राणी असल्याची स्तुतिसुमने तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते
दिनेश त्रिवेदी यांनी गुरुवारी उधळली होती.

Web Title:  'Mamta Banerjee is Putinamavshi'