शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खोटे बोलणाऱ्या मोदींचे तोंड सर्जिकल टेप लावून बंद केले पाहिजे, ममता बॅनर्जींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:50 IST

भाजपा नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सातत्याने शाब्दीक चकमकी उडत आहे.

नागराकाटा (पश्चिम बंगाल) - गेल्या काही वर्षांमध्ये बंगालच्या राजकारणात एकछत्री अंमल प्रस्थापित करणाऱ्या ममता बॅनर्जींसमोर यावेळी भाजपाने जोरदार आव्हान उभे केले आहे. त्यामुळे भाजपा नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सातत्याने शाब्दीक चकमकी उडत आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ''मोदींना सत्ता आणि राजकारणातून दूर केले पाहिजे. तसेच त्यांचे तोंड चिटकणाऱ्या सर्जिकल टेपने बंद करून टाकले पाहिजे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.  ''पाच वर्षांच्या कार्यकाळापैकी साडे चार वर्षे नरेंद्र मोदी जगभ्रमंतीच करण्यात गुंतले होते. त्यामुळे शेतकरी आणि मध्यमवर्गाच्या समस्यांकडे लक्ष देण्यासांनी मोदींना वेळ मिळाला नाही. आता निवडणुका जवळ आल्याने मोदी प्रत्येकाला घाबरवत आहेत, धमकावत आहेत, खोटे बोलत आहेत. जर खोटं बोलण्याची स्पर्धा आयोजित केली गेली, त्यात नरेंद्र मोदींना पहिले बक्षीस मिळेल, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला.  ''मोदींना खोटे बोलता येऊ नये म्हणून यावेळच्या निवडणुकीत जनता नरेंद्र मोदींच्या ओठांना ल्युकोप्लास्ट लावून ते चिकटून टाकतील. देशहिताच्या दृष्टीने मोदींना केवळ पंतप्रधानपदच नव्हे तर राजकारणातूनही बाहेर करणे आवश्यक आहे.'' असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच मोदींनी मला धमक्या देऊ नयेत, तसे करणे ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरेल, अशा इशाराही त्यांनी दिला.  ''मोदींनी पाच वर्षांच्या कार्यकाळातील साडे चार वर्षए जग फिरण्यात घालवली. जेव्हा देशात शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा मोदी काय करत होते. जेव्हा नोटामंदीमुळे लोक मरत होते तेव्हा मोदी काय करत होते. जेव्हा कोट्यवधी लोक आपल्या नोकऱ्या गमवत होते. तेव्हा मोदी काय करत होते, अशा सवालांच्या फैरी ममता बॅनर्जी यांनी मोदींवर झाडल्या.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिकाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019