'ममतांच्या पीएमपदाच्या उमेदवारीस विरोध नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 07:16 IST2018-08-06T05:51:40+5:302018-08-06T07:16:03+5:30
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपविरोधात एक भक्कम आघाडी स्थापन करावी, असे आग्रही मत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी व्यक्त केले आहे.

'ममतांच्या पीएमपदाच्या उमेदवारीस विरोध नाही'
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपविरोधात एक भक्कम आघाडी स्थापन करावी, असे आग्रही मत माजी पंतप्रधानएच. डी. देवेगौडा यांनी व्यक्त केले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विरोधी पक्षांच्या आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार करण्यास आपला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. देवेगौडा यांच्या पक्षाने कर्नाटकात काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावील, असेही त्यांनी म्हटले आहे.
>काय म्हणाले देवेगौडा...
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, तिसरी आघाडी स्थापन करण्याची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात आहे. ममता बॅनर्जी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. इंदिरा गांधी १७ वर्षे पंतप्रधान होत्या. पुरुषांनाच पंतप्रधान का करावे? ममता किंवा मायावती का नकोत? असे सांगत त्यांनी पंतप्रधानपदासाठी महिला उमेदवारास विरोध नसल्याचे संकेत दिले.