शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

"दीदी, तुमची हिम्मत कशी झाली..!", ममता बॅनर्जींच्या 'त्या' वक्तव्यावर मणिपूरचे मुख्यमंत्री संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 21:55 IST

N Biren Singh on Mamata Banerjee : "बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल; पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत."

N. Biren Singh on  Mamata Banerjee : कोलकाता येथील डॉक्टर बलात्कार आणि खून प्रकरणामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील विरोधीपक्ष भाजप मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. अशातच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईशान्य भारताबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन  मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग संतापले असून, त्यांनी कठोर शब्दात ममता बॅनर्जींना सुनावले.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले की, "ममता दीदी ईशान्य भारताला धमकावण्याची तुमची हिम्मत कशी झाली...या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. तुम्ही ईशान्य आणि उर्वरित देशाची सार्वजनिकपणे माफी मागितली पाहिजे. आपल्या राजकारणातून हिंसाचार आणि द्वेष पसरवणे थांबवा. सार्वजनिक व्यासपीठावर हिंसाचाराची धमकी देणे राजकीय नेत्यासाठी अयोग्य आहे," असे त्यांनी म्हटले.

हिमंता बिस्वा सरमा यांचा पलटवार  आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीदेखील ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, "दीदी, तुमची आसामला धमकावण्याची हिम्मत कशी झाली? आम्हाला लाल डोळे दाखवू नका. आपल्या अपयशाच्या राजकारणाने भारताला जाळण्याचा प्रयत्नही करू नका. फूट पाडणारी भाषा बोलणे आपल्याला शोभत नाही."

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?भाजपने पुकारलेल्या बंगाल बंदसंदर्भात बोलताना सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काही लोकांना वाटत आहे की, हा बांगलादेश आहे... मला बांग्लादेश आवडतो, तेथील लोकही आमच्यासारखेच बोलतात. बांग्लादेश आणि बंगालची संस्कृती एकच आहे. पण लक्षात ठेवा बांग्लादेश एक वेगळा देश आहे आणि भारत एक वेगळा देश आहे. मोदी बाबू आपण आपल्या पक्षाला सांगून आग लावत आहात, जर बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल, पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत. ना उत्तर प्रदेश, ना बिहार, ना ओडिशा गप्प राहतील. दिल्लीही शांत राहणार नाही... आपली खुर्चीही हालेल," अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा