शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ED ची छापेमारी, NCERT च्या प्रस्तावावर ममता भडकल्या; थेट मोहम्मद बिन तुघलकाशी केली भाजपची तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 17:43 IST

ईडीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोतला समन्स पाठवले आहे. याशिवाय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या संपत्तीवर छापेमारीही केली आहे. याच बरोबर ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्या विरोधातही ईडीने कारवाई केली आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर होत असलेल्या ईडीच्या छापेमारीवरून त्यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला. याच वेळी, देशात निवडणुकीचा घाणेरडा खेळ खेळला जात आहे. तसेच, भाजप मुहम्मद बिन तुघलकाप्रमाणे इतिहास बदलू इच्छित असल्याचेही ममतांनी म्हटले आहे.

ईडीची छापेमारी -ईडीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोतला समन्स पाठवले आहे. याशिवाय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या संपत्तीवर छापेमारीही केली आहे. याच बरोबर ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्या विरोधातही ईडीने कारवाई केली आहे. 

ममता बॅनर्जी गुरुवाकरी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या, 'काय अत्याचार, काय अनाचार सुरू आहे? भाजप लोकसभा निवडणुकीपूर्वी, संपूर्ण देशभरात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या छापेमारीच्या नावाखाली घाणेरडा खेळ खेळत आहे. एवढेच नाही, तर भाजपच्या  एखाद्या नेत्याच्या घरावर ईडीने छापेमारी केली का? असा सवालही यावेळी ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

गुन्हा दाखल करायची धमकी -पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्या ठिकाणांवरील ईडीच्या छापेमारीसंदर्भात, ममतांनी ईडीवर गुन्हा दाखल करण्याचीही धमकी दिली आहे. त्या म्हणाल्या, ज्योतिप्रिय यांची प्रकृती बरी नाही. ईडीच्या छापेमारीदरम्यान त्यांना काही झाले, तर मी गुन्हा दाखल करेन. एवढेच नाही, भाजपला 'सबका साथ सबका विकास' हवा आहे असे म्हणतात, पण प्रत्यक्षात याचा अर्थ 'सबका साथ सबका विनाश' असा आहे, असेही ममता म्हणाल्या.

NCERT वरही निशाणा - शाळेच्या अभ्यासक्रमात 'इंडिया' एवजी 'भारत', असा बदल करण्याच्या मुद्द्यावरूनही मामता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला. ममता म्हणाल्या, भाजप मुहम्मद बिन तुघलकाप्रमाणे इतिहास बदलू इच्छित आहे. यावेळी त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटीचाही उल्लेख केला. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा