शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

ममता बॅनर्जीच लागू देणार नाहीत भाजपला गळती? दीदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 15:37 IST

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले अनेक नेते तृणमूलमध्ये घरवापसी करण्याच्या विचारात

कोलकाता: पश्चिम बंगालची सत्ता राखत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं हॅटट्रिक केली. बंगाल जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यभर सभा घेतल्या. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं. मात्र तरीही तृणमूलनं सत्ता राखली. त्यामुळे आता सर्व चक्रं उलटी फिरू लागली आहेत. तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र त्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी करू इच्छिणाऱ्या नेत्यांमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, शमिक भट्टाचार्य, राजीव बॅनर्जी, सोनाली गुहा, दिपेंदू विश्वास यांच्यासह अनेक नेते तृणमूलमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. भाजपचे तब्बल ३० हून अधिक आमदार तृणमूलमध्ये येऊ इच्छितात. विशेष म्हणजे निवडणुकीआधी जवळपास इतक्याच आमदारांनी तृणमूलची साथ सोडली होती. तृणमूलनं सत्ता राखल्यानं नेते घरवापसीच्या तयारीत असले, तरी पक्षाच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या तरी या नेत्यांना पुन्हा पक्ष प्रवेश देण्याच्या मनस्थितीत नाहीत. आता बंगालबाहेरही मोदींना टक्कर देणार दिदी; पक्षाचं नाव बदलण्यासंदर्भात सुरू आहे रणनीती!तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तृणमूलची पुन्हा सत्ता आल्यानंतर या नेत्यांना त्यांची चूक जाणवली आहे. पाच वर्ष विरोधात राहून संघर्ष करण्यापेक्षा स्वगृही परतण्याचा विचार या नेत्यांकडून सुरू आहे. मात्र या घरवापसीसाठी ममता फारशा अनुकूल नाहीत. त्यामुळे उघड नाराजी व्यक्त केलेल्या नेत्यांना भाजपमध्येच राहावं लागू शकतं. तृणमूल सोडून गेलेल्या नेत्यांच्या घरवारसीचा निर्णय ममता बॅनर्जीच घेतील, अशी माहिती पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी दिली.बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शनन्यूज १८ इंडियानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा प्रवेश देण्याच्या मनस्थितीत नाही. यासाठी ममतांना कोणतीही घाई नाही. 'पक्ष अडचणीत असताना, संकटांचा सामना करत असताना साथ सोडून जाणाऱ्यांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. पक्ष सोडून जाणाऱ्या अनेकांनी नेतृत्त्वाला ब्लॅकमेल केलं होतं. अशा नेत्यांना पुन्हा पक्षात घेतल्यास पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते,' अशी माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१