शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रामलला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ममता बॅनर्जींनी आखलाय मंदिर प्लॅन! केली मोठी घोषणा; जाणून घ्या, काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 18:40 IST

ममता बॅनर्जी यांनी नुकतेत भाजपावर निशाणा साधत म्हटले होते की, लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटनाच्या माध्यमाने नौटंकी केली जात आहे. मी अशा उत्सवावर विश्वास ठेवते, जो सर्वांना सोबत घेऊन चालतो.

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेस 22 जानेवारीला 'सद्भाव रॅली' काढणार आहे. ही रॅली सर्व धर्मांना मानणाऱ्या लोकांसाठी असेल, असे ममतांनी म्हटले आहे. याच दिवशी अयोध्येत रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रमही आहे.

याशिवाय, तृणमूलच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये ब्लॉक स्तरावरही सर्व धर्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 'सर्व धर्म समान' अशी या रॅलीची थीम आहे. ममता बॅनर्जी 22 जानेवारीला कोलकाता येथील कालीघाट मंदिरालाही भेट देणार आहेत. यानंतर त्या रॅलीला सुरुवात करतील.

काय म्हणाल्या ममता? ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी 22 जानेवारीला एक रॅली करणार आहे. काली मंदिरापासून या रॅलीची सुरुवात होईल. या मंदिरात मी काली मातेची पूजा करेन आणि यानंतर आम्ही हाजरा येथून पार्क सर्कल मैदानापर्यंत एक आंतरधर्मीय रॅली काढणार आहोत. येथे एक बैठकही होईल. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांचेच स्वागत आहे. यावेळी सर्व धर्माचे लोक उपस्थित राहतील."

भाजपावर साधला होता निशाणा - ममता बॅनर्जी यांनी नुकतेत भाजपावर निशाणा साधत म्हटले होते की, लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटनाच्या माध्यमाने नौटंकी केली जात आहे. मी अशा उत्सवावर विश्वास ठेवते, जो सर्वांना सोबत घेऊन चालतो. आपण निवडणुकीपूर्वी नौटंकी करत आहात. यामुळे मला काही समस्या नाही. मात्र, दुसऱ्या समाजाची अवहेलना करणे योग्य नाही.'' 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा