शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

ममता बॅनर्जींनी सख्ख्या भावाशी असलेलं नातं तोडलं, म्हणाल्या, तो विसरला की...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 5:22 PM

Mamata Banerjee Family: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी त्यांचे सख्खे भाऊ बुबुन बॅनर्जी यांच्याशी असलेलं नातं तोडलं आहे. ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय त्यांच्या भावाने हावडा येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर घेतला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी त्यांचे सख्खे भाऊ बुबुन बॅनर्जी यांच्याशी असलेलं नातं तोडलं आहे. ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय त्यांच्या भावाने हावडा येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर घेतला आहे. दरम्यान, बुबुन बॅनर्जी हे भाजपाच्या तिकिटावर हावडा येथून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

भावाशी असलेलं नातं तोडण्याचा निर्णय घेतल्यावर ममता बॅनर्जी यांनी भाऊ बुबुन बॅनर्जी याच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, तो आता माझा भाऊ राहिलेला नाही. आजपासून मी त्याच्याशी असलेलं नातं तोडत आहे. माझं कुटुंब आणि मी स्वत:ला त्याच्यापासून दूर करत आहोत. जेव्हा आमच्या वडिलांचं निधन झालं होतं तेव्हा पालन पोषण कसं झालं होतं, हे तो विसरला आहे. तो तेव्हा अडीच वर्षांचा होता. मी ३५ रुपये कमवायची आणि त्याचं पालन पोषण करायची, अशी आठवण ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितली.

दरम्यान, या घटनेनंतर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांचं सरकार आणि पक्षावर नियंत्रण राहिलेलं नाही. आता त्यांच्या भावानेच तृणमूल काँग्रेसविरोधात बंडखोरी केली आहे. त्यांनी तृणमूलचे उमेदवार प्रसून मुखर्जी यांच्या नावाबाबत असहमती दर्शवली. हा ममता बॅनर्जींकडून अभिषेक बॅनर्जी यांना इतरांपेक्षा अधिक प्राधान्य देण्याचा परिणाम आहे.

तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये १६ विद्यमान खासदारांवर पुन्हा विश्वास दर्शवण्यात आला आहे. तर नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांच्यासह सात खासदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. २०१९ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ४२ जागांपैकी २३ जागांवर विजय मिळाला होता. यावेळी ममता बॅनर्जी यांनी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बरहामपूर येथून काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसFamilyपरिवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४