Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 14:36 IST2025-12-13T14:36:01+5:302025-12-13T14:36:46+5:30

Mamata Banerjee And Lionel Messi : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या मिसमॅनेजमेंटवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Mamata Banerjee apologies to angry footbal fans Lionel Messi amid ruckus in salt lake stadium kolkata | Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज

Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या मिसमॅनेजमेंटवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्या स्वतः हजारो क्रीडाप्रेमी आणि चाहत्यांसोबत त्यांचा आवडता फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या, परंतु तिथे जो गोंधळ दिसला, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.

मुख्यमंत्र्यांनी लिओनेल मेस्सी आणि सर्व क्रीडाप्रेमींची या दुर्दैवी घटनेबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. त्या म्हणाल्या की "ही घटना अत्यंत दुर्दैवी असून यामुळे राज्याच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. मी माफी मागते." ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय तपास समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही समिती निवृत्त न्यायाधीश आशीम कुमार रे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे.

तपास समितीला संपूर्ण घटनेची सविस्तर चौकशी करणे, जबाबदारी निश्चित करणे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. दिग्गज खेळाडू मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. सकाळी तो कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर पोहोचला. चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.

Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड

मेस्सी ५ ते १० मिनिटांसाठी आला आणि निघून गेला. यामुळे संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये तोडफोड केली. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूची एक झलकही पाहता आली नाही. चाहत्यांनी मिसमॅनेजमेंटचा आरोप करत "मेस्सीच्या आसपास फक्त नेते आणि अभिनेतेच होते... मग आम्हाला कशाला बोलावलं? आम्ही १२ हजारांचं तिकीट घेतलं, पण आम्ही त्याचा चेहराही पाहू शकलो नाही..." असं म्हटलं आहे.

Web Title : मेस्सी के कार्यक्रम में गड़बड़ी पर ममता बनर्जी ने मांगी माफी, जांच के आदेश

Web Summary : सॉल्ट लेक स्टेडियम में लियोनेल मेस्सी के कार्यक्रम में कुप्रबंधन के लिए पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने माफी मांगी। उन्होंने निराशा व्यक्त की और घटना की जांच के लिए सेवानिवृत्त न्यायाधीश के नेतृत्व में एक उच्च स्तरीय जांच की घोषणा की। दोषियों पर सख्त कार्रवाई की जाएगी।

Web Title : Mamata Banerjee Apologizes After Chaos at Messi Event; Inquiry Ordered

Web Summary : West Bengal CM Mamata Banerjee apologized for mismanagement at Lionel Messi's event in Salt Lake Stadium. She expressed disappointment and announced a high-level inquiry led by a retired judge to investigate the incident and prevent future occurrences. Strict action will be taken against those responsible.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.