बर्निंग ट्रेन होण्यापासून सुदैवाने वाचली माळवा एक्स्प्रेस, एसी डब्याखाली लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 12:23 IST2024-09-26T12:20:01+5:302024-09-26T12:23:24+5:30
Malwa Express Fire: मध्य प्रदेशमधील इंदूर येथे माळवा एक्स्प्रेस मोठ्या अपघाताची शिकार होण्यापासून थोडक्यात बचावली. या ट्रेनच्या एसी कोचखाली आग लागली होती. मात्र प्रसंगावधान राखून ही आग विझवण्यात आली. त्यामुळे माळवा एक्स्प्रेस बर्निंग ट्रेन होण्यापासून थोडक्यात बचावली.

बर्निंग ट्रेन होण्यापासून सुदैवाने वाचली माळवा एक्स्प्रेस, एसी डब्याखाली लागली आग
मध्य प्रदेशमधील इंदूर येथे माळवा एक्स्प्रेस मोठ्या अपघाताची शिकार होण्यापासून थोडक्यात बचावली. या ट्रेनच्या एसी कोचखाली आग लागली होती. मात्र प्रसंगावधान राखून ही आग विझवण्यात आली. त्यामुळे माळवा एक्स्प्रेस बर्निंग ट्रेन होण्यापासून थोडक्यात बचावली.
माळवा एक्स्प्रेस इंदूर जिल्ह्यातील महू येथून जम्मू तावी कटरापर्यंत धावते. महू ते इंदूर दरम्यान धावत्या ट्रेनच्या एसी कोचखालून अचानक आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. त्यानंतर ट्रेन थांबवून आग विझवण्यात आली. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र वेळीच आग नियंत्रणात आणण्यात आल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, या दुर्घटनेबाबत देण्यात येत असलेल्या माहितीनुसार ट्रेनचे ब्रेक चिकटले होते. त्यामुळे एसी कोच खालून ठिणग्या उडाल्या आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती. मात्र ट्रेन वेळीच रोखून आग शमण्यात आली.