कर्जबाजारी मल्ल्यांची गोव्यामध्ये जंगी पार्टी ?
By Admin | Updated: December 16, 2015 14:53 IST2015-12-16T13:38:38+5:302015-12-16T14:53:47+5:30
किंगफिशर एअरलाईन्स बुडीत निघाल्यामुळे किंग ऑफ गुड टाईम म्हणून ओळखले जाणारे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना सध्या किंग ऑफ बॅड टाईमच्या अनुभवातून जावे लागत आहे.

कर्जबाजारी मल्ल्यांची गोव्यामध्ये जंगी पार्टी ?
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १६ - किंगफिशर एअरलाईन्स बुडीत निघाल्यामुळे किंग ऑफ गुड टाईम म्हणून ओळखले जाणारे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना सध्या किंग ऑफ बॅड टाईमच्या अनुभवातून जावे लागत आहे. डोक्यावर बँकांच्या कर्जाचा डोंगर असल्यामुळे तुम्हाला वाटत असेल सध्या मल्ल्या काटकसर करायला लागले असतील.
पण तुम्हा हा समज साफ चुकीचा आहे कारण मल्ल्या यांना त्यांची शान आजही तितकीच प्यारी आहे. सध्या गोव्याच्या कंडोलिम बीचजवळच्या किंगफिशर व्हिलामध्ये विजय मल्ल्या यांच्या ६० व्या वाढदिवसाची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
येत्या १८ डिसेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. एक नव्हे तब्बल तीन दिवस त्यांचा हा जंगी वाढदिवस सोहळा रंगणार असल्याची माहिती आहे. प्रसिध्द गायक एनरिके इग्लेसियस, सोनू निगम यांचे कार्यक्रम होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
माध्यमांना कुणकुण लागू नये यासाठी मल्ल्या यांच्या जंगी वाढदिवस सोहळयाची अत्यंत गुप्तपणे तयारी सुरु आहे. सरकारी बँकांची कर्ज थकवली म्हणून विजय मल्ल्यांची चौकशीही झाली आहे.