शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

मल्ल्या, मोदी, चोक्सीच्या मालमत्तेचा ईडीकडून लिलाव; घोटाळ्याचे ८,४४१ कोटी बँकेत जमा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 07:45 IST

उपलब्ध माहितीनुसार, या तिन्ही उद्योगपतींनी बँकांना गंडा घातल्याची तक्रार सीबीआयकडे केल्यानंतर या प्रकरणात ईडीनेदेखील ईसीआयआर नोंदवत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. तसेच या तिघांची मिळून एकूण १८ हजार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, दागिने, सोने अशी मालमत्ता जप्त केली होती. 

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्ज घेत या बँकांना गंडा घालणाऱ्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची मालमत्ता जप्त करत आणि त्यांची विक्री करत त्याद्वारे आलेले ८,४४१ कोटी रुपये ईडीने बँकांना परत केले आहेत. या तिघांनी मिळून बँकांना तब्बल २३ हजार कोटी रुपयांचा गंडा घातला होती. ईडीच्या ताज्या कारवाईनंतर या घोटाळ्यापैकी २२ हजार ५८५ कोटी रुपये आतापर्यंत घोटाळ्याचा फटका बसलेल्या बँकांना परत मिळाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, या तिन्ही उद्योगपतींनी बँकांना गंडा घातल्याची तक्रार सीबीआयकडे केल्यानंतर या प्रकरणात ईडीनेदेखील ईसीआयआर नोंदवत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. तसेच या तिघांची मिळून एकूण १८ हजार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, दागिने, सोने अशी मालमत्ता जप्त केली होती. 

त्यानंतर जुलै २०२२मध्ये नीरव मोदी याची आणखी काही मालमत्ता हाँगकाँग येथे असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासादरम्यान समजले. त्यानंतर ईडीने नीरव मोदी याची २,६५० कोटी ७० लाख रुपयांची हाँगकाँग येथील मालमत्ता जप्त केली होती. 

जप्त केलेल्या मालमत्तांचा न्यायालयीन प्रक्रियेनंतर लिलाव करण्यात ईडीला यश आले असून, अलीकडे केलेल्या लिलावाद्वारे ८,४४१ कोटी रुपये ईडीला मिळाले. हे पैसे ईडीने घोटाळ्याचा फटका बसलेल्या बँकांना परत केले आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत २३ हजार कोटी रुपयांपैकी २२ हजार ५८५ कोटी रुपये बँकांना परत मिळाले आहेत. 

कुणाचे किती घोटाळे? --  सध्या लंडनमध्ये असलेल्या विजय मल्ल्याने त्याच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकप्रणित ११ बँकांकडून घेतलेले कर्ज बुडविल्यामुळे या बँकांना ६,२०० कोटी रुपयांचा फटका बसला होता. त्याचबरोबर तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केल्याचा त्याच्यावर ठपका आहे. -  हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५७८ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. तो सध्या लंडनमध्ये कैदेत आहे.-  नीरव मोदीचा भाचा असलेला मेहुल चोक्सी यानेदेखील मोदी याच्यासोबत मिळून पंजाब नॅशनल बँकेला गंडा घातला आहे.

१,७०० प्रकरणांत १ लाख कोटींची मालमत्ता जप्त -गेल्या १५ वर्षांत मनी लाँड्रिंग कायद्याखाली एकूण १,७०० प्रकरणांत कारवाई केली असून, या कारवाईअंतर्गत तब्बल १ लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीVijay Mallyaविजय मल्ल्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय