कर्जबुडवे असल्याचा ठपका मल्ल्यांना अमान्य

By Admin | Updated: September 5, 2014 02:50 IST2014-09-05T02:50:14+5:302014-09-05T02:50:14+5:30

युनायटेड ब्रिवरीज ग्रुपचे अध्यक्ष आणि किंगफिशर एअरलाईन्सचे प्रमोटर विजय मल्ल्या यांना युनायटेड बँक ऑफ इंडियाने सहेतुक कजर्बुडवे असे जाहीर केलेले आहे.

Mallya denies being a loser | कर्जबुडवे असल्याचा ठपका मल्ल्यांना अमान्य

कर्जबुडवे असल्याचा ठपका मल्ल्यांना अमान्य

बंगळूर : युनायटेड ब्रिवरीज ग्रुपचे अध्यक्ष आणि किंगफिशर एअरलाईन्सचे प्रमोटर विजय मल्ल्या यांना युनायटेड बँक ऑफ इंडियाने सहेतुक कजर्बुडवे असे जाहीर केलेले आहे. मात्र मल्ल्या यांना हे मान्य नसून त्यांनी सर्व उपलब्ध कायदेशीर मार्ग वापरणार असल्याचे  गुरुवारी स्पष्ट केले. 
युबी लिमिटेडच्या 15 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त मल्ल्या येथे आले असताना वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,‘‘बँकेने जी कारवाई केली आहे त्यासंदर्भात मी याआधीच प्रसारमाध्यमांना निवेदन दिले आहे. त्यात आम्ही आमच्यावरील आरोप अमान्य केले आहेत. तक्रार निवारण समितीने जे निष्कर्ष काढले आहेत ते आम्हाला मान्य नाहीत, शिवाय समितीसमोर आम्हाला बाजू मांडण्याची संधीही दिली गेलेली नाही.’’ 
देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून उपलब्ध असलेले सगळे कायदेशीर उपाय आम्ही करणार आहोत. किंगफिशर एअरलाईन्सने अनेक खाती सुरू करून त्यात पैसा वळविला असा आरोप होता. या प्रकरणी युनायटेड बँक ऑफ इंडियाने 1 ऑगस्ट रोजी विजय मल्ल्या व अन्य तीन संचालकांना ‘सहेतुक कजर्बुडवे’ (विलफुल डिफॉल्टर) म्हणून 
जाहीर केले. (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Mallya denies being a loser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.