भोपाळ येथे आयोजित एका जनसभेमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. भारत-अमेरिका व्यापार करार (Trade Deal), शेतकऱ्यांची दुरावस्था, बेरोजगारी आणि लोकशाहीची सद्यस्थिती यावरून त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. देशाचा स्वाभिमान कमकुवत केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
"भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, परंतु अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामध्ये देशाच्या मान-प्रतिष्ठेशी तडजोड करण्यात आली आहे" असं म्हणत खरगे यांनी सरकारने देशाचा स्वाभिमान गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप केला. तसेच देशात लोकशाही आणि संविधान दोन्ही धोक्यात असल्याचं काँग्रेस अध्यक्षांनी नमूद केलं.
"पंतप्रधान रेडिओवर 'मन की बात' बोलतात, पण संसदेत चर्चा टाळतात, घाबरतात" अशी टीका करत त्यांनी सरकारने संसदेत येऊन प्रश्नांना उघडपणे उत्तरं द्यावीत अशी मागणी केली. शेतीचा मुद्दा उपस्थित करताना खरगे म्हणाले की, "भारतातील सुमारे ६५ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत, तर अमेरिकेत हे प्रमाण केवळ २-३ टक्के आहे. सरकारच्या धोरणांमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांना पिकाला योग्य भाव मिळत नाही."
"हुकूमशाही प्रवृत्ती, भ्याडपणाचं लक्षण"; युथ काँग्रेस अध्यक्षांच्या अटकेवरुन राहुल गांधी आक्रमक
युवा काँग्रेसच्या कार्याचं कौतुक करताना मल्लिकार्जुन खरगे सांगितलं की, तरुणांनी बेरोजगारीचा मुद्दा आता ताकदीने उचलून धरला आहे. पण सरकार तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, पण काँग्रेस याला घाबरणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला.
"काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तर आरएसएसशी संबंधित लोक स्वातंत्र्य चळवळीचा भाग नव्हते" असं विधान खरगे यांनी केलं. काँग्रेस गांधींच्या विचारधारेवर चालते आणि आज तरुणांच्या हक्कासाठी राहुल गांधींसारखे नेते मैदानात आहेत असंही त्यांनी सांगितलं. तसेच भाषणाच्या शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना न घाबरता संघर्ष करण्याचं आवाहन केलं.
Web Summary : Kharge criticized Modi's government in Bhopal, alleging trade deal compromises, farmer distress, and democratic threats. He accused the government of weakening national pride and avoiding parliamentary debates, favoring radio addresses instead. He also highlighted youth unemployment and the Congress party's historical role.
Web Summary : भोपाल में खरगे ने मोदी सरकार पर व्यापार समझौते, किसान संकट और लोकतंत्र पर खतरे का आरोप लगाया। उन्होंने सरकार पर राष्ट्रीय गौरव को कमजोर करने और संसदीय बहस से बचने का आरोप लगाया, रेडियो संबोधन को तरजीह दी। उन्होंने युवा बेरोजगारी और कांग्रेस की ऐतिहासिक भूमिका पर भी प्रकाश डाला।