शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

'मला या वातावरणात जगायचे नाही...', राज्यसभेत भावूक झाले मल्लिकार्जुन खरगे; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 14:57 IST

राज्यसभेच्या कामकाजादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अतिशय भावूक झाले.

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी(दि.31) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) अतिशय भावूक झाले. मंगळवारी (30 जुलै) भाजप नेते घनश्याम तिवारी (Ghanshyam Tiwari) यांनी खरगे यांच्या नावावर केलेल्या टिप्पणीमुळे खरगे दुखावले गेले. यावेळी त्यांनी, घनश्याम तिवारी काही टिप्पण्या सभागृहातून काढून टाकण्याची विनंतीही केली. यावर राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले की, ते घनश्याम तिवारी यांनी मंगळवारी सभागृहात केलेल्या टिप्पण्यांवर लक्ष देतील आणि मन दुखावले जाईल, अशी कोणतीही गोष्ट रेकॉर्डवर राहणार नाही.

राजीव गांधी फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये किती SC,ST,OBC? सीतारमन यांचं वर्मावर बोट!

मल्लिकार्जुन खरगे भावूक...भाजपचे खासदार घनश्यान तिवारी यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर बोचरी टीका केली आणि त्यांच्यावर घराणेशाहीचाही आरोप केला. दरम्यान, आज राज्यसभेचे कामकाज सुरू होताच मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, माझ्या पालकांनी अतिशय विचारपूर्वक माझे नाव ठेवले आहे. आपल्या मुलाचे नाव 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असावे, अशी त्यांची इच्छा होती. घनश्याम तिवारी यांना माज्या नावाची काय अडचण आहे? असा सवाल त्यांनी केला.

मला या वातावरणात जगायचे नाहीते पुढे म्हणाले, घनश्याम तिवारी यांनी माझ्यावर घराणेशाहीचाही आरोप केला. पण, मी सांगू इच्छितो की, राजकारणात प्रवेश करणारा मी माझ्या कुटुंबातील पहिला व्यक्ती आहे. माझे वडील आणि आई राजकारणात नव्हते. आई गेल्यानंतर वडिलांनी मला वाढवले आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचलो आहे. अध्यक्ष महोदय मला या वातावरणात जगायचे नाही, अशी प्रतिक्रिया खरगेंनी दिली. त्यावर धनखड म्हणाले की, तुम्ही दीर्घायुषी व्हाल, आणखी खुप पुढे जाल.

काय म्हणाले होते घनश्याम तिवारी?भाजप खासदार घनश्यान तिवारी यांनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर घराणेशाहीचा आरोप करत मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव घेतले होते. ते म्हणाले की, 'त्यांचे नाव मल्लिकार्जुन आहे. मल्लिकार्जुन भगवान शंकराचे एक नाव आहे. ज्याप्रमाणे भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठा करताना संपूर्ण कुटुंबाची प्राणप्रतिष्ठा केली जाते, त्याप्रमाणे ह्यांनी राजकारणात आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्राणप्रतिष्ठा केली.'  यावर विरोधी खासदारांनी जोरदार गदारोळ केला आणि ही टिप्पणी रेकॉर्डमधून काढण्याची मागणी केली. 

'INDI आघाडीच्या घाणेरड्या राजकारणाचा पर्दाफाश', PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा