शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:56 IST

Prasad Purohit News: लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आता लष्कराने त्यांना पदोन्नती दिली आहे.  लेफ्टिनेंट कर्नल पदावर असलेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने कर्नल पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

देशभरात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या  कोर्टाने प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह भारतीय लष्करातील लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली होती. प्रसाद पुरोहित यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आता लष्कराने त्यांना पदोन्नती दिली आहे.  लेफ्टिनेंट कर्नल पदावर असलेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने कर्नल पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

एनआयएच्या विशेष न्यायालयाने ३१ जुलै रोजी प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष सुटका केली होती. लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब तयार करण्यासाठी काश्मीरमधून आरडीएक्स मागवलं होतं आणि त्यांच्याच घरी बॉम्ब तयार करण्यात आला होता, याबाबतचे कुठलेही पुरावे नसल्याने कोर्टाने नमूद केले आहे. प्रसाद पुरोहित यांना सुमारे १७ वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर ही पदोन्नती मिळाली आहे. प्रसाद पुरोहित यांच्या पदोन्नतीच्या वृत्ताला लष्कराने दुजोरा दिला असून, पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पदोन्नतीनंतर आता प्रसाद पुरोहित यांचा कर्तव्यावर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

२००८ साली महाराष्ट्रातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने प्रसार पुरोहित यांना अटक केली होती. दहशतवादाच्या आरोपाखाली अटक झालेले पुरोहित हे सेवेत असलेले लष्करातील एकमेव अधिकारी होते. सुमारे ९ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर २०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने पुरोहित यांना जामीन दिला होता. त्यानंतर ३१ जुलै २०२५ रोजी एनआयए कोर्टाने पुरोहित यांच्यासह सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.  

English
हिंदी सारांश
Web Title : Malegaon Blast: Prasad Purohit, Acquitted, Promoted to Colonel by Army

Web Summary : Prasad Purohit, acquitted in the Malegaon blast case, has been promoted to Colonel by the Army. NIA court cleared him due to lack of evidence linking him to the bomb. After a 17-year legal battle, Purohit's promotion allows him to return to duty.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानMalegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोट