मलेशियन महिलेवर जयपूरमध्ये बलात्कार
By Admin | Updated: June 7, 2014 15:43 IST2014-06-07T15:42:55+5:302014-06-07T15:43:16+5:30
देशात महिलांवरील अत्याचारांचे सत्र सुरूच असून जयपूरमध्ये एका मलेशियन महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मलेशियन महिलेवर जयपूरमध्ये बलात्कार
>ऑनलाइन टीम
जयपूर, दि. ७ - देशात महिलांवरील अत्याचारांचे सत्र सुरूच असून आता एका मलेशियन महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भिलवाडा येथील रहिवासी असलेल्या एका ३० वर्षीय तरूणाला अटक केली आहे.
पीडित महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, ती महिला तीन दिवसांपूर्वी जयपूर येथे आली होती व तिची आरोपीशी ओळख झाली. गुरूवारी रात्री त्या दोघांनी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण घेतले, त्यानंतर आरोपीने तिला गुंगीचे औषध मिसळून एक पेय प्यायला दिले. त्यानंतर आरोपीने त्या महिलेला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला व नंतर तिला तिच्या हॉटेलसमोर सोडले.
त्या महिलेने जवाहर सर्कल भागातील पोलिस स्टेशन कसेबसे गाठले व तक्रा नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील चौकशी सुरू आहे.