जम्मू: जम्मूच्या आर.एस. पुरा येथील बालसुधारगृहातून कैदी फरार झाल्याच्या प्रकरणाने आता आंतरराष्ट्रीय वळण घेतले आहे. या संपूर्ण कटाचा मास्टरमाईंड 'कर्णजीत सिंह उर्फ गुग्गा' असून, या कटासाठी त्याला मलेशियातून रसद पुरवण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा हात असण्याची दाट शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
तपासात असे समोर आले आहे की, गुग्गा हा बालसुधारगृहात असताना तिथल्याच वाय-फाय सुविधेचा आणि लपवून आणलेल्या मोबाईलचा वापर करून बाहेरील हस्तकांशी संपर्कात होता. काही गुपिते ॲप्सच्या माध्यमातून त्याने हा फरार होण्याचा प्लॅन आखला होता. फरार झाल्यानंतर पंजाबमध्ये त्याला एका साथीदाराने नवीन मोबाईलही उपलब्ध करून दिला होता.
पोलिसांचा अजब कारभारया प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अंबाला येथून अटक करण्यात आलेला पाकिस्तानी नागरिक 'मोहम्मद सना-उल्लाह' हा आधीच पोलिसांच्या ताब्यात असूनही, जम्मू पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. आरोपी आधीच ताब्यात असताना अशी नोटीस प्रसिद्ध झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
बालसुधारगृहात चक्क गावठी कट्टा कसा पोहोचला आणि विदेशातून पैसे कुणी पाठवले, याचा शोध आता एनआयए आणि स्थानिक पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा धागा थेट पाकिस्तानातील दहशतवादी गटांशी जोडला जात असल्याने जम्मू-काश्मीरमध्ये हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Web Summary : Jammu jailbreak mastermind received funds from Malaysia. Pakistani groups suspected. Police inefficiencies exposed after arresting a Pakistani national but issuing a missing persons notice. NIA investigates foreign funding.
Web Summary : जम्मू जेल ब्रेक के मास्टरमाइंड को मलेशिया से फंडिंग मिली। पाकिस्तानी समूहों पर संदेह। पाकिस्तानी नागरिक को गिरफ्तार करने के बाद गुमशुदगी का नोटिस जारी करने पर पुलिस की अक्षमता उजागर। एनआईए विदेशी फंडिंग की जांच कर रही है।