ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रगती साधावी - पाटील
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:06+5:302015-02-14T23:52:06+5:30
वडवळ नागनाथ : ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधावी आणि समाज व राष्ट्राच्या उभारणीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी शुक्रवारी येथे केले़

ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रगती साधावी - पाटील
व वळ नागनाथ : ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधावी आणि समाज व राष्ट्राच्या उभारणीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी शुक्रवारी येथे केले़ अमरज्योती ग्रंथालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन कसबे होते़ यावेळी सरपंच भगवान लोखंडे, माणिक हालिंगे यांची उपस्थिती होती़ यावेळी स्नेहल उस्तुर्गे, प्रतीक्षा खेमे, प्रणिता भुरे, श्वेता मामिलवाड, सरस्वती काळे, सरस्वती सूर्यवंशी, अमृता सूर्यवंशी, दैवशाला सोरटे आदींचा सत्कार करण्यात आला़ प्रास्ताविक वैजनाथप्पा नंदागवळे यांनी केले़ आभार हावगीराव बेरकिले यांनी मानले़ यावेळी रणजित घुगे, एम़एम़ निजवंते, एऩके़आगलावे, डी़आऱसरकाळे आदींची उपस्थिती होती़