शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सहकार क्षेत्राला अधिक सक्षम बनविणार; अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 06:03 IST

Amit Shah : सहकार क्षेत्रातील दिग्गजांची शाह यांनी घेतली भेट. सहकार चळवळीला मजबूत करण्यास बांधील असल्याचं वक्तव्य.

ठळक मुद्देसहकार क्षेत्रातील दिग्गजांची शाह यांनी घेतली भेट.सहकार चळवळीला मजबूत करण्यास बांधील असल्याचं वक्तव्य.

नवी दिल्ली : सहकार क्षेत्र आणि सर्व सहकारी संस्था यांना अधिक सक्षम बनविण्याचा निर्धार सरकारने केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केले आहे. देशाच्या सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची शाह यांनी शनिवारी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले.

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करून नव्याने निर्माण केलेल्या केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे सोपविल्यानंतर तिसऱ्याच दिवशी शाह यांनी सहकार क्षेत्रातील दिग्गजांची भेट घेतली आहे. शाह यांना भेटणाऱ्यांत नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडियाचे चेअरमन दिलीप संघानी, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेडचे (इफको) चेअरमन बी. एस. नकाई, इफकोचे व्यवस्थापकीय संचालक यू. एस. अवस्थी आणि नाफेडचे चेअरमन बिजेंदरसिंग यांचा समावेश आहे. शहा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सहकार क्षेत्र आणि सर्व सहकारी संस्थांना सक्षम बनविण्याचा निर्णय घेतला आहे. 

सहकार चळवळीला मजबूत करण्यास बांधीलशाह यांनी अद्याप नवनिर्मित सहकार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. मात्र, त्याआधीच त्यांनी सहकार क्षेत्रातील लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या बैठकीत शाह यांनी सांगितले की, इफको आणि कृभको यांसारख्या सहकारी संस्थांनी बियाणे उत्पादन आणि सेंद्रिय शेती या क्षेत्रात काम करावे. 

पडीक असलेल्या ३८ हजार हेक्टर जमिनीचा वापर त्यांनी त्यासाठी करावा. देशातील सहकार चळवळीला मजबूत करण्यास सरकार बांधील आहे. शेतकरी उत्पादन संस्थांना (एफपीओ) देण्यात येणाऱ्या सवलती व लाभ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना देण्यात येईल.

टॅग्स :Amit Shahअमित शहाIndiaभारतCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी