शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:58 IST

Yamuna River Boat Accident: वृंदावन येथे यमुना नदीत भाविकांनी भरलेली एक बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.

Vrindavan Boat Accident: उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वृंदावन येथे यमुना नदीत भाविकांनी भरलेली एक बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. बोट उलटल्यानंतर त्यावरील अनेक भाविक नदीच्या पात्रात बुडू लागले. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीमध्ये २५ ते ३० भाविक असल्याचं म्हटलं जात आहे. 

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. स्थानिक गोताखोरांच्या मदतीने पाण्यात बुडणाऱ्या अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र अद्यापही काही लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मृतांचा आकडा वाढल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, यमुनेच्या केशी घाटावर ही धक्कादायक घटना घडली. पंजाबमधील भाविकांनी भरलेली एक बोट पुलाला धडकल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १० भाविकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली दखल

मथुरेतील या भीषण घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांना योग्य ती आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy in Vrindavan: Boat capsizes in Yamuna, several dead, missing.

Web Summary : A boat carrying devotees capsized in the Yamuna River in Vrindavan, Mathura, resulting in multiple fatalities and missing persons. Rescue operations are underway, with authorities and local divers assisting. Chief Minister Yogi Adityanath has ordered swift relief efforts and compensation for victims' families.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूViral Videoव्हायरल व्हिडिओriverनदीAccidentअपघात