शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेश-राजस्थान निवडणुकीपूर्वी कर्नाटकात मोठ्या हालचाली ! डीके शिवकुमार यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 15:14 IST

काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात पुन्हा एकदा मोठी नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार फोडण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचा दावा उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्वपक्षीयांनी केली आहे. तर दुसरीकडे  कर्नाटकमध्ये राजकीय पेचप्रसंग तीव्र होत आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या एका वक्तव्यामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. 'कर्नाटक सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू आहे. मोठ्या प्रमाणात षडयंत्र असल्याचा डीके शिवकुमार यांनी दावा केला आहे. त्यांनी कोणाचेही नाव न घेता ते यशस्वी होणार नसल्याचे सांगितले. कर्नाटकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात काही मतभेद सुरू असल्याचे बोलले जात आहे.

MP च्या निवडणूक सर्व्हेनं भाजपाची झोप उडाली; आकडे पाहून काँग्रेस नेते सुखावले

काल मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे गृहमंत्री जी परमेश्वरा आणि राज्य सरकारच्या इतर मंत्र्यांसोबत डिनरवर होते, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना बाजूला केल्याचे बोलले जात आहे. खरे तर राज्यात काँग्रेस पक्षाच्या विजयानंतर  शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसत होते, पण हायकमांडने त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले आणि सध्या ते तेच पदावर आहेत. 

उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले की, काही मोठे चेहरे काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी मोठे षडयंत्र रचले जात आहे. शिवकुमार यांना पाठिंबा देणारे एक आमदार गनिगा रवी यांनी शुक्रवारी रात्री बैठक आयोजित केली तेव्हा त्यांनी हे विधान केले. शिवकुमार यांना पाठिंबा देणारे नेते आणि आमदार या बैठकीला उपस्थित होते. यादरम्यान अडीच वर्षानंतर फक्त डीके शिवकुमारच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती.

गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सिद्धरामय्यांची काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शिवकुमार समर्थकांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतल्याचे समजते. गृहमंत्री परमेश्वरा, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोली आणि समाज कल्याण मंत्री एचसी महादेवप्पा या बैठकीला उपस्थित होते. सतीश आणि महादेवप्पा हे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. राज्यात सुरू असलेल्या सत्तेच्या राजकारणात शिवकुमार एकाकी पडत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या जवळचे मंत्री सतीश जारकीहोळी २० आमदारांसह परदेश दौर्‍याची योजना आखत असल्याचे सांगितले जात आहे, याकडे त्यांचे ताकदीचे प्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसBJPभाजपा