Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय हवाई दलाचा मोठा निर्णय; ब्रिटनला लढाऊ विमाने पाठविणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 14:56 IST2022-02-26T14:56:00+5:302022-02-26T14:56:25+5:30
Russia-Ukraine War: युएनएससीमध्ये रशियाविरोधातील व्हिटोला भारताने पाठिंबा दिला नाही. हा धक्का ब्रिटन, अमेरिकेला पचलेला नसताना भारतीय हवाई दलाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय हवाई दलाचा मोठा निर्णय; ब्रिटनला लढाऊ विमाने पाठविणार नाही
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. यामुळे भारतीय हवाई दलाने महत्वाचा निर्णय घेतला असून ब्रिटनमध्ये लढाऊ विमाने पाठविण्यात येणार नाहीत. या पावलामुळे ब्रिटन, अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.
युएनएससीमध्ये रशियाविरोधातील व्हिटोला भारताने पाठिंबा दिला नाही. हा धक्का ब्रिटन, अमेरिकेला पचलेला नसताना भारतीय हवाई दलाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ब्रिटनमध्ये बहुदेशीय युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कोब्रा वॉरिअर २०२२ हा युद्धसराव होणार होता. भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने या युद्धाभ्यासात भाग घेणार होती.
हवाईदलाने निर्णय घेत या युद्धसरावामध्ये भाग न घेण्याचे जाहीर केले आहे. कोबरा वॉरियर 2022 चे आयोजन ६ ते २७ मार्चपर्यंत करण्यात आले आहे. ब्रिटनच्या वेलिंग्टनमध्ये हा युद्धसराव होणार होता. भारतीय हवाई दलाने शनिवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. हवाई दल या युद्धसरावासाठी पाच लढाऊ विमाने पाठविणार होती. हा निर्णय का घेतला हे हवाईदलाने स्पष्ट केलेले नाही. परंतू युक्रेनमध्ये युद्ध सुरु असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.