शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Jammu-Kashmir: नागरिकांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 900 हून अधिक जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 9:49 PM

Jammu Kashmir: सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये समाजविघातक घटकांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) गेल्या काही दिवसांपासून हत्यासत्र सुरू आहे. गेल्या सात दिवसांत दहशतवाद्यांनी सात नागरिकांची गोळ्या घालून हत्या केल्यामुळे काश्मीरमधील दहशतीचे सावट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये समाजविघातक घटकांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. (900 over ground workers of let trf held in kashmir after attacks on minority civilians)

जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम), अल-बद्र आणि द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) च्या 900 हून अधिक ओव्हर ग्राउंड लोकांना (ओजीडब्ल्यू) ताब्यात घेतले आहे.

सूत्रांनी सीएनएन न्यूज 18 ला दिलेल्या माहितीनुसार,  काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अल्पसंख्याक नागरिकांवर हल्ला केल्यानंतर ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. विविध तपास यंत्रणांकडून या ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व लोकांची संयुक्त चौकशी सुरू आहे. 

सुत्रांचे म्हणणे आहे की, तपास यंत्रणा अटक केलेल्या ओव्हर-ग्राऊंड लोकांना विचारण्याचा प्रयत्न करीत आहेत की, हे सर्व जम्मू-काश्मीरमधील अल्पसंख्याक समुदायालाच का लक्ष्य करत आहेत. दरम्यान, खोऱ्यातील काश्मिरी पंडित व्यापारी माखन लाल बिंदरू आणि इतर दोन नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी टीआरएफ प्रमुखने घेतली आहे.

अलीकडेच, जम्मू पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले होते की, दहशतवाद्यांनी  बिंदरू मेडीकेटचे मालक  बिंदरू(68) यांना त्यांच्या फार्मसीमध्ये असताना लक्ष्य केले होते. यानंतर रात्री 8.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी लाल बाजार परिसरात गोलगप्पा विक्रेता वीरेंद्र पासवान याची हत्या केली. 

वीरेंद्र पासवान हे बिहारमधील भागलपूरचे रहिवासी होते. यानंतर रात्री 8.45 च्या सुमारास दहशतवाद्यांनी बांदीपोराच्या शाहगुंड परिसरात एका सामान्य नागरिकाची हत्या केली. जम्मू -काश्मीर पोलिसांनी सांगितले की, मृताचे नाव मोहम्मद शफी लोणे असे असून तो नायदखाईचा रहिवासी आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर