शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री बदलले, आता पुढे काय..? मोदी-शहा गुजरातमध्ये मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 21:51 IST

गुजरात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर; बालेकिल्ला राखण्यासाठी मोदी-शहांच्या हालचाली सुरू

अहमदाबाद: विजय रुपाणी यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पटेल पुढील काही दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भूपेंद्र पटेल यांचं नाव कुठेच नव्हतं. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया, पुरुषोत्तम रुपाला, लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोरधन झडफिया यांची नावं चर्चेत होती. मात्र भाजप नेतृत्त्वानं भूपेंद्र पटेल यांच्या नावाला पसंती दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या विजय रुपाणी यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. शनिवारी दुपारी रुपाणी यांनी राज्यपालांची भेट घेतली. ते राजीनामा देतील असा अंदाज कोणीही बांधला नव्हता. रुपाणी यांच्या राजीनाम्याचा निर्णय शुक्रवारी रात्री झाल्याचं समजतं. शुक्रवारी रात्री अमित शाहगुजरातला आले होते आणि सकाळी दिल्लीला परत गेले. भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; भाजपाच्या विधिमंडळ बैठकीत निर्णय

लवकरच मंत्रिमंडळातही मोठे बदल होण्याची शक्यतामुख्यमंत्री बदलण्यात आल्यानंतर आता भाजप नेतृत्त्वाकडून गुजरात सरकारमध्ये आणखी बदल अपेक्षित आहेत. आज तकनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अनेक विद्यमान मंत्र्यांना नारळ मिळणार आहे. तर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. रुपाणी यांचा चेहरा घेऊन भाजपनं आगामी विधानसभा निवडणूक लढवल्यास पक्ष पराभूत होण्याचा अंदाज होईल अशी शक्यता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली होती. त्यामुळेच रुपाणी यांना हटवण्यात आल्याचं समजतं.

रुपाणी यांचा राजीनामा कशासाठी?मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा कशासाठी घेण्यात आला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र भाजपनं या निर्णयाची तयारी आधीपासूनच केल्याचं सांगितलं जात आहे. भाजप अशाप्रकारचे प्रयोग करत आला आहे, वेळोवेळी नेतृत्त्व बदल गरजेचा आहे, असं भाजप नेते पुरुषोत्तम रुपाला यांनी म्हटलं होतं. कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश, पाटीदारांची नाराजी, बेरोजगारी यामुळे रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागल्याचं बोललं जात आहे.

टॅग्स :Bhupendra Patelभूपेंद्र पटेलAmit Shahअमित शाहVijay Rupaniविजय रूपाणीGujaratगुजरातBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी