शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

केंद्राची मोठी कारवाई; 40000 कंपन्यांना लागणार टाळे, एक-एक रुपया वसूल केला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 18:41 IST

केंद्र सरकारने मनी लॉन्ड्रिंगविरोधात देशातील हजारो शेल कंपन्यांवर कारवाई केली आहे.

नवी दिल्ली: फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना तयार केली आहे. निष्क्रिय(Dormant Companies)   कंपन्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या टार्गेटवर एक-दोन नव्हे, तर 40 हजार कंपन्या आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने या कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

6 महिन्यांपासून निष्क्रिय कंपन्यांवर कारवाईइकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कॉर्पोरेट मंत्रालयाने अशा कंपन्यांची नोंदणी रद्द केली आहे, ज्यांचा व्यवहार गेल्या 6 महिन्यांपासून बंद आहे. अशा कंपन्यांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच त्यांच्यावर कारवाईही सुरू आहे. अहवालानुसार, या गुप्त कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंगसारख्या गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसारिपोर्टनुसार या कंपन्यांचा वापर चुकीच्या मार्गाने विदेशात पैसे पाठवण्यासाठी केला जातो. म्हणजेच या कंपन्यांमध्ये काळा पैसा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. सरकार सतत अशा कंपन्यांची ओळख करून कारवाई करते. गेल्या वर्षीही अशाच हजारो कंपन्यांवर कारवाई झाली होती. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी) सुमारे दोन वर्षांपासून कोणताही व्यवसाय न करणाऱ्या कंपन्यांवर तसेच या कालावधीत व्यवसाय डेटा शेअर न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करतात. 

नोटाबंदीनंतर वेगाने कारवाईनोटाबंदीपासून सरकार शेल कंपन्यांवर झटपट कारवाई करत आहे. अशा कंपन्यांमध्ये काळा पैसा वापरला जात असल्याचा संशय आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सुमारे 23 लाख कंपन्या नोंदणीकृत आहेत, त्यापैकी केवळ 14 लाख कंपन्या कार्यरत आहेत. आतापर्यंत सुमारे 8 लाख कंपन्यांनी आपला व्यवसाय बंद केल्याचे आकडेवारी सांगते.

थकबाकी वसूल केली जाईलसरकारने केवळ शेल कंपन्यांना टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला नाही, तर त्यांच्यावर जे काही सरकारचे दायित्व असेल, तेही वसूल केले जाईल. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, अशा कंपन्या आणि त्यांच्या संचालकांवरील थकबाकी रद्द केली जाणार नाही, तसेच कंपनीच्या वतीने काही व्यवहार असल्यास, त्यांच्या संचालकांना आणि कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावले जाईल. म्हणजेच या कंपन्यांना टाळे ठोकल्यानंतरही त्यांच्याकडून थकबाकी वसूल करण्यात येईल.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारCrime Newsगुन्हेगारी