लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) : लखीमपूर खेरी जिल्ह्यातील ईसानगर पोलीस स्टेशन हद्दीतील रणजित नगर पुलावर मंगळवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. दोन खासगी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका नेपाळी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुमारे ३५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
बसमधील बहुतांश प्रवासी नेपाळी नागरिक आहेत. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, दोन्ही बसमधील प्रवाशांना जबर मार लागला. रूपैडीहा आणि श्रावस्ती येथून शिमला येथे जाणारी मिनी बस आणि लखनऊहून धौरहराकडे येणारी दुसरी खासगी बस पुलावर समोरासमोर धडकल्या. अपघातात सुमारे ३५ प्रवासी जखमी झाले, त्यापैकी जवळपास १५ नेपाळी नागरिक आहेत.
गंभीर अवस्थाप्राथमिक उपचारानंतर, सुमारे १५ ते २३ गंभीर जखमींना तातडीने लखीमपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एका नेपाळी महिलेचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच ईसानगर, खमरिया आणि धौरहरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक शमशेर बहादूर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Web Summary : A head-on collision between two private buses on a Lakhimpur Kheri bridge resulted in the death of a Nepali woman and injuries to over 35 passengers, many of whom are Nepali citizens. Seriously injured were rushed to the hospital.
Web Summary : लखीमपुर खीरी में एक पुल पर दो निजी बसों की आमने-सामने की टक्कर में एक नेपाली महिला की मौत हो गई और 35 से अधिक यात्री घायल हो गए, जिनमें से कई नेपाली नागरिक हैं। गंभीर रूप से घायलों को अस्पताल पहुंचाया गया।