कोचीमध्ये मोठा अपघात, हेलिकॉप्टरचा दरवाजा तुटल्यानं 2 नौसैनिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 14:17 IST2018-12-27T14:17:09+5:302018-12-27T14:17:16+5:30
कोची नेव्हल बेसमध्ये एक मोठा अपघात घडला आहे.

कोचीमध्ये मोठा अपघात, हेलिकॉप्टरचा दरवाजा तुटल्यानं 2 नौसैनिकांचा मृत्यू
केरळ- कोची नेव्हल बेसमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा तुटून पडल्यानं दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता कोची नेव्हल बेसमध्ये घडली आहे. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार, या अपघातात दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा या दोन्ही नौसैनिकांच्या अंगावर कोसळला आणि अपघातात त्या नौसैनिकांचा मत्यू झाला. या अपघातात आणखी दोन ते तीन नौसैनिक जखमी झाले असून, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Two sailors died after the door of a helicopter hangar fell on them. The incident occurred today morning at Southen Naval Command in Kochi, Kerala.Court of inquiry being ordered into the matter. pic.twitter.com/RgOP3Tvj9j
— ANI (@ANI) December 27, 2018