मणिपूरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर अमित देसवाल शहीद

By Admin | Updated: April 14, 2016 09:24 IST2016-04-14T09:24:34+5:302016-04-14T09:24:34+5:30

झेलियांगग्राँग युनायटेड फ्रंटच्या (झेडयूएफ) दहशतवाद्यांसोबत बुधवारी झालेल्या चकमकीत मेजर अमित देसवाल यांना वीरमरण आलं

Maj Amit Deswal Shaheed In an encounter with terrorists in Manipur | मणिपूरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर अमित देसवाल शहीद

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर अमित देसवाल शहीद

>ऑनलाइन लोकमत - 
मणिपूर, दि. १४ - तामेंगलोंग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 21 पॅराचे मेजर अमित देसवाल शहीद झाले आहेत. झेलियांगग्राँग युनायटेड फ्रंटच्या (झेडयूएफ) दहशतवाद्यांसोबत बुधवारी झालेल्या चकमकीत मेजर अमित देसवाल यांना वीरमरण आलं. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मादेखील करण्यात आला आहे. 
 
राष्ट्रीय रायफल्स आणि विशेष दलाच्या जवानांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असल्याची माहिती अधिका-यांनी दिली. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान अमित देसवाल यांच्या पोटाला गोळी लागल्याने जखमी झाले होते. जखमी अवस्थेतून त्यांनी दुस-या जागी हलवण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. शहीद मेजर अमित देसवाल हरियाणाच्या झंजर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. 
 

Web Title: Maj Amit Deswal Shaheed In an encounter with terrorists in Manipur