मैत्रेय फाऊंडेशनमध्ये नगरकरांचे अडकले कोट्यवधी रुपये कंपनीचे स्थानिक कार्यालय बंद : गुंतवणूक करणार्या महिलांची वणवण भटकंती
By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:14+5:302017-01-31T02:06:14+5:30
अरुण वाघमोडे

मैत्रेय फाऊंडेशनमध्ये नगरकरांचे अडकले कोट्यवधी रुपये कंपनीचे स्थानिक कार्यालय बंद : गुंतवणूक करणार्या महिलांची वणवण भटकंती
अ ुण वाघमोडे अहमदनगर : मैत्रेय फाऊंडेशन प्रा़ लि़ या कंपनीत नगर शहरासह जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असून, वर्षभरापूर्वी या कंपनीने येथील मंगळवार बाजारातील कार्यालयही बंद केले आहे़ गेल्या सात वर्षांपासून गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावेत यासाठी अनेकांची वणवण भटकंती सुरू असून, कंपनीच्या अधिकार्यांकडून मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने गुंतवणूकदार हवालदील झाले आहेत़ मैत्रेय फाऊंडेशन या कंपनीत गेल्या सात वर्षांपासून गुंतवणूक केलेल्या २५ महिलांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे़ मैत्रेय फाऊंडेशनचे राज्यासह देशभरात विविध कार्यालय आहेत़ या कंपनीने सुवर्ण सिद्धी, प्लॉटस्, आणि रिलेटर अशा आकर्षक स्किमचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून मंथली, तिमाही, सहामाही आणि वार्षिक हप्त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये उकळले़ सहा ते सात वर्षांपासून गुंतवणूक केलेल्या हजारो गुंतवणूकदारांच्या पॉलिसीचा कालावधी पूर्ण झालेला आहे़ त्यांना मात्र परतावा म्हणून एक रुपयाही मिळालेला नाही़ फाऊंडेशनच्या नगर येथील मंगळवार बाजारातील कार्यालयाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी १६ जुलै २०१० पासून गुंतणवणूक करण्यास सुरुवात केली़ मंथली १०० रूपयांपासून ते १० हजार रूपयांपर्यंत विविध स्किमच्या माध्यमातून ही गुंतवणूक होती़ चार वर्षात दीडपट ते सहा वर्षांत दुप्पट असे योजनांचे आमिष होते़ कंपनीकडून चांगला परतावा मिळणार असल्याने शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी मुलींच्या लग्नासाठी, घर बांधण्यासाठी अशा विविध कारणांसाठी कंपनीत पैसे गुंतविले तसेच या कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करत इतरांचेही पैसे घेऊन कंपनीत भरले़ पैसे भरलेल्यांमध्ये मात्र कुणालाच परत काहीच मिळाले नाहीत़ या कंपनीत प्रतिनिधी म्हणून काम करणार्या महिलांकडे ज्यांच्याकडून यांनी पैसे घेतले आहेत़त्यांनी तगादा लावला असून, या महिलाही हवालदिल झाल्या आहेत़ शहरातील माळीवाडा येथील अरुण भिंगारदिवे, शीला देवडे, शोभना भिंगारदिवे, सुनंदा जगताप, कल्पना भिंगारदिवे, सरस्वती नवगिरे, सीमा सोनवणे, भामा कांबळे, अग्नेश ओहोळ, वर्षा भिंगादिवे, सागर शिरसाठ यांच्यासह २५ जणांची स्वाक्षरी असलेले निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असून, या कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे़ अपूर्ण़़़़़़़़़़़़