शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

केंद्र अन् भाजपमध्ये फेरबदलाचा ‘माैसम’! परदेशातून परतताच पंतप्रधान माेदी यांची अमित शाह यांच्यासाेबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 07:38 IST

BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी परदेश दौऱ्यावरून परतताच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मणिपूरच्या मुद्द्यांवर चर्चा केली

- संजय शर्मा  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी परदेश दौऱ्यावरून परतताच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मणिपूरच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यापासून ते राज्यपाल अनसूया उइके यांना बदलणे आणि पुढील महिन्यात जुलैमध्ये सरकार आणि संघटनेत मोठे बदल करण्यावर दीर्घ चर्चा झाली. सूत्रांनी सांगितले की, मणिपूरबाबत लवकरच केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये दिसेल. पुढील महिन्यात केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत अनेक मोठे बदल दिसतील. काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल, नव्या नियुक्त्यांची घोषणाही होऊ शकते. 

अमेरिका आणि इजिप्तच्या परदेश दौऱ्यानंतर भारतात पोहोचताच दिल्ली विमानतळावरच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. पक्षातर्फे चालविलेल्या जनसंपर्क अभियानाची माहिती घेतली. गृहमंत्री अमित शाह यांनी मोदी यांची भेट घेऊन त्यांना मणिपूरमधील स्थितीची व सर्वपक्षीय बैठकीतील सर्व नेत्यांच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. पंतप्रधानांनी अमरनाथ यात्रेच्या तयारीबाबत गृहमंत्र्यांशी  चर्चा केली आणि सुरक्षाव्यवस्था वाढविण्यास सांगितले.

लवकरच निवडणुकीचे रणशिंगn पंतप्रधान मोदी यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशातील शहडोल आणि भोपाळमध्ये जाऊन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकतील. n जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात भाजप संघटना आणि सरकारमधील बदलाचे काम पूर्ण होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

काय बदलणार?- सूत्रांचा दावा आहे की, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पुढील महिन्याच्या सुरुवातीला सरकार आणि भाजप संघटनेत मोठे बदल होऊ शकतात. - पाच राज्यांचे निवडणूक प्रभारी नियुक्त करायचे असून, काही नवे राष्ट्रीय सरचिटणीस नियुक्त करायचे आहेत. काही केंद्रीय मंत्र्यांना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संघटनेची जबाबदारीही दिली जाईल. - विरोधी महाआघाडीपेक्षा एनडीए परिवार मोठा करण्यासाठी काही मित्रपक्षांनाही सरकारमध्ये सामावून घेतले जाणार आहे. - यात बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, महाराष्ट्रातील शिंदे गटाचे खासदार तसेच अकाली दलाशी संभाव्य युती पाहता, हरसिमरत कौर बादल यांच्या नावाचा समावेश आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहJ P Naddaजगत प्रकाश नड्डा