शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सहारा प्रमुखांच्या कारागृहातील सोयी कायम ठेवा

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

आताच अडचण, तर मग

आताच अडचण, तर मग
जामिनाचे पैसे कसे जमणार?
सर्वोच्च न्यायालयाची विचारणा : सहारा प्रमुखांच्या तुरुंगातील सोयी कायम ठेवण्याची मागणी

नवी दिल्ली : सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या जामिनावर सुटकेसाठी आवश्यक रकमेची जमवाजमव हा समूह कशी करणार याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. दुसरीकडे सहारा समूहाच्या वतीने न्यायालयाला रॉय यांच्या तिहार कारागृहातील सुविधा आणखी चार ते सहा आठवडे वाढवून देण्याची विनंती करण्यात आली आहे. विदेशातील आपल्या संपत्तीची विक्री करण्याच्या दृष्टीने संभाव्य खरेदीदारांसोबत वाटाघाटींसाठी समूहाला ही मुदतवाढ हवी आहे.
तुम्हाला १०,००० कोटी रुपये दंड भरण्यातच अडचण येत आहे. मग कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ३०,००० कोटी रुपये कसे चुकविणार? अशी विचारणा या प्रकरणाची सुनावणी करीत असलेल्या न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सहारा समूहाच्या वकिलास केली असून आपल्या उपरोक्त विनंतीसंदर्भात योग्य पद्धतीने अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे.
तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून सेबीप्रमाणे आपल्यालाही सहारा वादात पक्षकार बनविण्याची विनंती केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. रिझर्व्ह बँकेने सहारा समूहाच्या एका कंपनीला संपत्तीची विक्री करण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. रॉय यांच्या सुटकेसाठी ही संपत्ती विकण्यास कंपनी इच्छुक आहे.
सहारा इंडिया फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला (एसआयएफसीएल) सेबीची बाकी रक्कम अदा करण्यासाठी तिच्या रोख्यांसह कुठल्याही संपत्तीचा वापर करण्यापासून रोखण्यात यावे. कारण एसआयएफसीएल विशेष श्रेणीची गैरबँकिंग वित्तीय कंपनी असून ती आमच्या अखत्यारीत येते, असे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे.
रॉय यांच्या जामिनासाठी १०,००० कोटी रुपये जमविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतर्गत विदेशातून सुमारे १०५ कोटी डॉलर्स कर्जाचा प्रस्तावित सौदा अपयशी ठरला असल्याची माहिती सहारा समूहाने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ९ जानेवारी रोजी सहारा समूहाला काही अटींसह प्रस्तावित सौद्यावर चर्चा पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली होती. अमेरिकेत जमविलेला पैसा भारतात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मंजुरी आवश्यक राहील, याही एका अटीचा त्यात समावेश होता.
गुंतवणूकदारांचा २०,००० कोटींच्यावर निधीची व्याजासह परतफेड करण्याच्या प्रकरणात सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय गेल्या वर्षीच्या ४ मार्चपासून तिहार कारागृहात बंदिस्त आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)