महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण कायम करा ग्रामस्थ करणार उपोषण
By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:34+5:302016-04-26T00:16:34+5:30
श्रीरामपूर : बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायकवाड वस्ती (ता. श्रीरामपूर) येथील शेती महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमणे कायम करण्याच्या मागणीसाठी बेलापूरचे उपसरपंच महेंद्र साळवी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार २६ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ आमरण उपोषण करणार आहेत.

महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण कायम करा ग्रामस्थ करणार उपोषण
श रीरामपूर : बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायकवाड वस्ती (ता. श्रीरामपूर) येथील शेती महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमणे कायम करण्याच्या मागणीसाठी बेलापूरचे उपसरपंच महेंद्र साळवी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार २६ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ आमरण उपोषण करणार आहेत.बेलापूर बुद्रुक येथील जमीन गट क्रमांक १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९ मध्ये झालेल्या अतिक्रमण धारकांना कायम मालकी हक्क मिळण्याबाबत मौजे बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड वस्ती येथे शेती महामंडळाच्या जागेत अतिक्रमण करून सुमारे ४०० ते ५०० कुटूंबांनी घरे बांधलेली आहेत. हे रहिवाशी ५० ते ६० वर्षांपासून याठिकाणी वास्तव्य करीत आहेत. सध्या त्याठिकाणी रहिवाशांनी पक्की घरे बांधलेली आहेत. त्यांच्या नावावर जागेचे उतारे नसल्यामुळे त्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे महामंडळाच्या जागेवरील ही अतिक्रमणे कायम करुन तेथे राहणार्या रहिवाशांच्या नावे ही जागा मिळावी, असा ठराव महामंडळाने बेलापूर ग्रामपंचायतीस पाठविला आहे. ही अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी असल्यामुळे सरकारी धोरणानुसार संरक्षणपात्र असल्याची वस्तुस्थिती विचारात घेऊन महसूल विभागाच्या धोरणानुसार चालू रेडिरेकनरनुसार कब्जे हक्काची रक्कम हे रहिवाशी शेती महामंडळास भरण्यास तयार असल्याचे उपसरपंच साळवी म्हणाले. (प्रतिनिधी)