शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

माहूर पालिकेसमोर ५० लाख वसुलीचे आव्हान

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

माहूर : मालमत्ता व विविध जागांच्या करापोटी माहूर पालिकेला ५० लाख रुपये येणे बाकी आहे़ पालिकेने दोन दिवसापूर्वी ९ गाळ्यांची हर्रासी करून ३५ लाख रुपयांचे तात्पुरते उत्पन्न मिळविले़ तथापि वसुली होत नसल्याने शहरातील विकासकामांचाही खेळखंडोबा झाला आहे़

माहूर : मालमत्ता व विविध जागांच्या करापोटी माहूर पालिकेला ५० लाख रुपये येणे बाकी आहे़ पालिकेने दोन दिवसापूर्वी ९ गाळ्यांची हर्रासी करून ३५ लाख रुपयांचे तात्पुरते उत्पन्न मिळविले़ तथापि वसुली होत नसल्याने शहरातील विकासकामांचाही खेळखंडोबा झाला आहे़
माहूर नगरपंचायत होवून ३ वर्षाचा कालावधी लोटला़ या तीन वर्षात राष्ट्रवादीच्या पाच महिला नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप नाकारल्याने त्यांना नारळ देण्यात आले़ पालिकेचा कारभार सध्या १२ नगरसेवकांवर सुरू आहे़ नगराध्यक्षा गौतमी कांबळे यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा नोंदविल्याने गोंधळात आणखीनच भर पडली़ पालिकेचा कारभार अधीक्षक वैजनाथ स्वामी व लिपिक किरण कोलगटुवार यांच्यावर सुरू आहे़ इतर १३ कर्मचारी मानधनावर कार्यरत आहेत़ तहसीलदार डॉ़आशिषकुमार बिरादार यांच्याकडे पालिकेचा पदभार आहे़ एकूणच परिस्थितीला तोंड देताना बिरादार अक्षरश: वैतागले आहेत़
माहूर पालिका हद्दीत १५३ दुकाने असून घरांची संख्या ३ हजार आहे़ हजारो प्लॉटस् बेवासर पडून आहेत़ ४०च्यावर शासकीय मालमत्ता कर न भरताच बिनधास्त सुरू आहेत़ करवसुलीसाठी पालिकेकडे कर्मचारीच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली़ ध्वनीक्षेपणाद्वारे कर भरण्याचे आवाहन केले जाते़ मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही़ निधी नसल्याने घनकचरा व्यवस्थापनही ढेपाळले असून संपूर्ण शहरात कचरा विद्रुपीकरण सुरू आहे़ पालिकेच्या जागेत नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून अल्पभाड्याने सुशिक्षित बेरोजगार, महिला बचतगट यांना देण्यात यावेत, अशी मागणी माजी नगराध्यक्षांसह विद्यमान नगरसेविकांनी केली आहे़