माहूर पालिकेसमोर ५० लाख वसुलीचे आव्हान
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:06+5:302015-04-04T01:55:06+5:30
माहूर : मालमत्ता व विविध जागांच्या करापोटी माहूर पालिकेला ५० लाख रुपये येणे बाकी आहे़ पालिकेने दोन दिवसापूर्वी ९ गाळ्यांची हर्रासी करून ३५ लाख रुपयांचे तात्पुरते उत्पन्न मिळविले़ तथापि वसुली होत नसल्याने शहरातील विकासकामांचाही खेळखंडोबा झाला आहे़

माहूर पालिकेसमोर ५० लाख वसुलीचे आव्हान
म हूर : मालमत्ता व विविध जागांच्या करापोटी माहूर पालिकेला ५० लाख रुपये येणे बाकी आहे़ पालिकेने दोन दिवसापूर्वी ९ गाळ्यांची हर्रासी करून ३५ लाख रुपयांचे तात्पुरते उत्पन्न मिळविले़ तथापि वसुली होत नसल्याने शहरातील विकासकामांचाही खेळखंडोबा झाला आहे़माहूर नगरपंचायत होवून ३ वर्षाचा कालावधी लोटला़ या तीन वर्षात राष्ट्रवादीच्या पाच महिला नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप नाकारल्याने त्यांना नारळ देण्यात आले़ पालिकेचा कारभार सध्या १२ नगरसेवकांवर सुरू आहे़ नगराध्यक्षा गौतमी कांबळे यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा नोंदविल्याने गोंधळात आणखीनच भर पडली़ पालिकेचा कारभार अधीक्षक वैजनाथ स्वामी व लिपिक किरण कोलगटुवार यांच्यावर सुरू आहे़ इतर १३ कर्मचारी मानधनावर कार्यरत आहेत़ तहसीलदार डॉ़आशिषकुमार बिरादार यांच्याकडे पालिकेचा पदभार आहे़ एकूणच परिस्थितीला तोंड देताना बिरादार अक्षरश: वैतागले आहेत़ माहूर पालिका हद्दीत १५३ दुकाने असून घरांची संख्या ३ हजार आहे़ हजारो प्लॉटस् बेवासर पडून आहेत़ ४०च्यावर शासकीय मालमत्ता कर न भरताच बिनधास्त सुरू आहेत़ करवसुलीसाठी पालिकेकडे कर्मचारीच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली़ ध्वनीक्षेपणाद्वारे कर भरण्याचे आवाहन केले जाते़ मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही़ निधी नसल्याने घनकचरा व्यवस्थापनही ढेपाळले असून संपूर्ण शहरात कचरा विद्रुपीकरण सुरू आहे़ पालिकेच्या जागेत नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून अल्पभाड्याने सुशिक्षित बेरोजगार, महिला बचतगट यांना देण्यात यावेत, अशी मागणी माजी नगराध्यक्षांसह विद्यमान नगरसेविकांनी केली आहे़