शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

“आपला लॉगइन आयडी अन् पासवर्ड शेअर करु नका”; मोइत्रा प्रकरणानंतर खासदारांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 14:54 IST

Mahua Moitra Cash For Query Case: महुआ मोइत्रा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सचिवालयाने लॉगइन-पासवर्डबाबतचे नियम बदलले आहेत.

Mahua Moitra Cash For Query Case: संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याबद्दल महुआ मोइत्रा यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय येण्याची शक्यता असून, महुआ मोइत्रा यांचे अपात्रता निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता संसदीय पोर्टलवरील आपला लॉगइन आयडी आणि पासवर्ड कुणालाही शेअर करू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या संदर्भातील कथित लाचखोरी प्रकरणानंतर आगामी हिवाळी अधिवेशनाआधी लोकसभा सचिवालयाने खासदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे, दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार गोपनीयता ठेवण्याचा व लॉगइन-पासवर्ड कुणालाही न देण्याची सूचना खासदारांना करण्यात आली आहे. महुआ मोइत्रा यांनी त्यांचे लोकसभा पोर्टलचे लॉगइन आणि पासवर्ड मुंबईचे उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्यासोबत शेअर केले होते व ते त्यांच्या वतीने त्यावरून प्रश्न विचारत असत. स्वतः मोईत्रा यांनी त्याची कबुली दिली होती. 

लोकसभा पोर्टलचा वापर फक्त खासदारच करतील

सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर खासदारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. लोकसभा पोर्टलचा वापर फक्त खासदारच करतील. ते आपले लॉगइन शेअर करू शकणार नाहीत. त्यासोबत इतरही काही सूचना खासदारांसाठी जारी करण्यात आल्या आहेत. नवीन संसदेच्या उद्घाटनानंतर 'संविधान सदन' असे नाव दिलेले आहे. जुने संसद भवन पाहण्यासाठी जगभरातून हजारो पाहुणे येत असतात. त्यासाठी खासदारांचे पत्र एवढीच अट पूर्वी होती. आता लोकसभा-राज्यसभेच्या उच्चपदस्थांच्या माध्यमातून पाहुण्यांव्यतिरिक्त अन्य सर्वसामान्यांना संसद पाहायचे असेल तर यासंदर्भातील अटी अधिक कडक करण्यात आल्या आहेत. जे तात्पुरते पास बनविले जातात, त्यांची प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत केली गेली आहे. 

दरम्यान, महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी झाली तर लोकसभा निवडणुकीपूर्वी ते त्यांनाच फायदेशीर ठरेल, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे एका कार्यक्रमात नोंदवले. हे भाष्य करताना बॅनर्जी यांनी मोइत्रा यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांवर मात्र कोणतेही भाष्य केले नाही. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाMahua Moitraमहुआ मोईत्रा