शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

कोरोनाने शिक्षणात मोठे बदल घडवले; महिंद्रा स्वतंत्र विद्यापीठ थाटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 05:47 IST

डेटा सायन्स, ब्लॉकचेन, डेटा कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल; अनॅलिटिक्ससारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाने इतर क्षेत्रांसह शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले आहेत. शिक्षण क्षेत्र या काळात पूर्णपणे आॅनलाइन व्यासपीठावर येत आहे. शिक्षणाच्या पद्धतीत बदल होत असतानाच शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक असल्याची भूमिका घेत महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने स्वत:चे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हैदराबादमध्ये १३० एकर जागेवर सुरू होणाऱ्या या विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रम शिकविले जातील.विद्यापीठाच्या आराखड्याप्रमाणे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात व्यवस्थापन शिक्षण (स्कूल आॅफ मॅनेजमेंट), इंदिरा महिंद्रा स्कूल आॅफ एज्युकेशन, २०२१-२२ मध्ये विधि शिक्षण (स्कूल आॅफ लॉ ), २०२२-२३ मध्ये माध्यम शिक्षण, तर २०२३-२४ मध्ये स्कूल आॅफ डिझाइन सुरू करण्याचा मानस आहे. यामध्ये २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या अभियांत्रिकी संस्थेचा समावेश असणार आहे. कोरोनानंतरच्या काळात पारंपरिक शिक्षणापेक्षा मानवतावादाचा अभ्यास करून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोकांच्या समस्या सोडविण्याची आवश्यकता आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या मदतीने मिळालेल्या नोकºया या कोरोना काळातील नुकसानभरपाई ठरू शकतील, असे मत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या विद्यापीठाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

नव्याने उदयाला येणाºया डेटा सायन्स, ब्लॉकचेन, डेटा अनॅलिटिक्ससारख्या तंत्रज्ञानासोबत समकालीन अभ्यासक्रमाचा समावेश या स्वायत्त विद्यापीठात असेल. टेक महिंद्रा कंपनीच्या ना नफा भागीदारी तत्त्वावर चालणाºया महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा हे विद्यापीठ भाग असणार आहे, असे त्यांनी सांगितले.जपानमधील तज्ज्ञांचीही मदत घेणारव्यावसायिक शिक्षण, प्रकल्पातून जगताना प्रत्यक्ष येणाºया समस्यांना तोंड देण्यासाठीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न या विद्यापीठातून करण्यात येईल. युरोप आणि अमेरिकेतील विद्यापीठांशिवाय जपानमधील तंत्रज्ञानामधील तज्ज्ञांची मदत घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.पुढील पाच वर्षांत ४००० हून अधिक विद्यार्थी तसेच ३०० हून अधिक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सांगितले.विद्यार्थ्यांमधीलप्रतिभा शोधणारमहिंद्रा विद्यापीठातून कॉर्पोरेट आणि उद्योग जगताला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय तंत्रशिक्षण पद्धतीमध्ये बदल होण्याची गरज असून उद्योगांतील आवश्यकतेप्रमाणे विद्यार्थ्यांमधील प्रतिभा शोधण्याची आवश्यकता आहे. आम्ही या विद्यापीठामधून नेमके तेच करणार आहोत.- विनीत नायर,अध्यक्ष महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राEducationशिक्षणuniversityविद्यापीठ