महात्मा गांधीजींचा मृत्यू अपघाती, ओडिशात राज्य सरकारच्या पुस्तकात उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 06:12 AM2019-11-16T06:12:13+5:302019-11-16T07:39:50+5:30

महात्मा गांधी यांचा मृत्यू हा एक ‘अपघात’ होता, असे राज्य सरकारच्या पुस्तकात म्हटल्याने नवा वाद उत्पन्न झाला आहे.

Mahatma Gandhi's death 'accidental, mentioned in the book of the state government in Odisha | महात्मा गांधीजींचा मृत्यू अपघाती, ओडिशात राज्य सरकारच्या पुस्तकात उल्लेख

महात्मा गांधीजींचा मृत्यू अपघाती, ओडिशात राज्य सरकारच्या पुस्तकात उल्लेख

Next

भुवनेश्वर : महात्मा गांधी यांचा मृत्यू हा एक ‘अपघात’ होता, असे राज्य सरकारच्या पुस्तकात म्हटल्याने नवा वाद उत्पन्न झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी माफी मागावी आणि ही चूक दुरुस्त करावी, अशी मागणी राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रकाशित पुस्तिका ‘आमा बापूजी : एका झलक’मध्ये त्यांचे कार्य, शिकवण आणि ओडिशाशी असलेले त्यांचे नाते याची माहिती देण्यात आली आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, दिल्लीच्या बिडला हाऊसमध्ये ३० जानेवारी १९४८ रोजी अचानक झालेल्या घटनाक्रमात गांधीजी यांचे आकस्मिक निधन झाले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री नरसिंह मिश्रा म्हणाले की, चुकीच्या माहितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. ही चूक ‘अक्षम्य कृती’ आहे.

Web Title: Mahatma Gandhi's death 'accidental, mentioned in the book of the state government in Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.