शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

योगींच्या राज्यात आंबेडकरांनंतर आता महात्मा गांधींचंही भगवेकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 20:54 IST

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर सरकारी इमारतींना भगव्या रंगानं रंगवण्याचा सिलसिला सुरू झाला आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर सरकारी इमारतींना भगव्या रंगानं रंगवण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. परंतु उत्तर प्रदेशमधल्या शाहजहांपूरमध्ये भगव्या रंगावर प्रेम करणा-यांनी चक्क गांधींचं भगवेकरण केलं आहे. गांधीजींचा पुतळा भगव्या रंगात रंगवल्यानं परिसरातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.शाहजहांपूरमधल्या ढाका घनश्यामपूर गावात हा प्रकार घडला आहे. जिथे 20 वर्षांपूर्वी महात्मा गांधींचा पुतळा उभारण्यात आला होता. 20 वर्षांपासून असलेल्या या पुतळ्यावर एका रात्रीत भगवा रंग चढवण्यात आला आहे. पण पुतळ्याच्या खाली पांढ-या रंगात राष्ट्रपिता असं लिहिलं आहे. भगव्या रंगात रंगवण्यात आलेला गांधीजींचा पुतळा गेल्या 20 वर्षांपासून सफेद रंगात होता. या प्रकरणात कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी दिला आहे. तर विश्व हिंदू परिषदेनं या पुतळ्यांचं भगवेकरण करण्याच्या प्रकाराला पाठिंबा दर्शवला आहे. जिल्हा प्रशासनानं याची चौकशी करण्याचं जाहीर केलं आहे.परंतु गांधीजींचा पुतळा भगव्या रंगात कोणी रंगवला याचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. विश्व हिंदू परिषदेचे राजेश अवस्थी म्हणाले, भगवा हा संतांचा रंग आहे. पुतळ्यांना भगवा रंग देण्याचे प्रकार सुरूच राहतील. गांधीजींच्या पुतळ्याचं भगवेकरण करण्यास भाजपाचा हात असल्याचं परिसरातील काही लोकांचं म्हणणं आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं शौचालयही भगव्या रंगानं रंगवण्यात आल्याचं समोर आलं होतं. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ