महाशिवरात्री जोड-१
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
वडोदबाजार : गावातील महादेव मंदिरात भाविकांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. लोहगड नांद्रा, देवदरी, मुर्डेश्वर, वेरूळ, वडोदवाडी, बोरगाव अर्ज आदी ठिकाणी वडोदबाजार येथील नागरिकांनी जाऊन दर्शन घेतले.
महाशिवरात्री जोड-१
वडोदबाजार : गावातील महादेव मंदिरात भाविकांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. लोहगड नांद्रा, देवदरी, मुर्डेश्वर, वेरूळ, वडोदवाडी, बोरगाव अर्ज आदी ठिकाणी वडोदबाजार येथील नागरिकांनी जाऊन दर्शन घेतले.लिंबेजळगाव : परिसरातील शिव-महादेव मंदिरात भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले व महाशिवरात्रीचा उपवास केला. महाशिवरात्रीनिमित्त जिकठाण येथील महादेव खडकेश्वर मंदिरात ह.भ.प. कुर्हाडे महाराज यांचे प्रवचन होऊन येणार्या भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने फलाहार, चहा आदींचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे शिरोडी येथील स्वयंभू महादेव मंदिरात अभिषेक, महापूजा व त्रिदिनी सप्ताह होऊन फलाहार वाटप करण्यात आला. लिंबेजळगाव येथील महादेव मंदिर, शेंदुरवादा येथील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, गुरुधानोरा येथील महादेव मंदिरात सकाळी अभिषेक, महाआरती व प्रवचन, फलाहार आदी कार्यक्रम संपन्न झाले. लिंबेजळगाव, टेंभापुरी, जिकठाण, दहेगाव बंगला, गुरुधानोरा, तुर्काबाद खराडी, राजुरा, डोमेगाव, रामनगर आदी गावांत आज महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन, प्रवचन व फलाहाराचे आयोजन करण्यात आले होते.बाजारसावंगी : बाजारसावंगी-धामणगाव (गोमुखी)व कनकशीळ येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. येथील महादेव मंदिरात जय बाबाजी भक्त परिवारातर्फे महाआरती करून पूजा, अभिषेक करण्यात येऊन विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर परिसरात फराळाचे वाटप करण्यात आले. संत निरंकारी मंडळातर्फे रेणुकादेवी मंदिराजवळील प्रांगणात भव्य सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. निरंकारी संत बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचा संदेश आचरणाबाबत प.पू. वसंत पाटील (बाप्पाजी) महाराज, बार्शी यांच्या रसाळ वाणीतून प्रवचनाने भक्तांना उपदेश देण्यात आला. सत्संगानंतर ग्रामस्थ व निरंकारी भक्तांतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले.