शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्री

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

धार्मिक वातावरणात साजरी झाली महाशिवरात्री

धार्मिक वातावरणात साजरी झाली महाशिवरात्री
मंदिरात उसळली भाविकांची गर्दी : ठिकठिकाणी अभिषेक, पूजा अन् जागरण
नागपूर : महादेवाचे अतिशय प्राचीन आणि स्वयंभू मंदिर नागपुरात आहे. हे सर्व मंदिर भाविकांच्या श्रद्धेय असल्याने, महाशिवरात्रीचा भव्य उत्सव या मंदिरांमध्ये साजरा करण्यात आला. अभिषेक, पूजा, भजन, कीर्तन, जागरण, महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी दिसून आली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले.
भूतेश्वर मंदिर, गुजरनगर
नागपुरातील सर्वात प्राचीन, ८०० वर्षाचा इतिहास असलेले भूतेश्वर शिवमंदिर जागृत देवस्थान आहे. स्मशानभूमीच्या परिसरात हे देवस्थान असल्याने याला भूतेश्वर हे नाव पडले आहे. या मंदिराप्रती भाविकांची श्रद्धा असल्याने, महाशिवरात्रीला सकाळपासूनच भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचेही वितरण करण्यात आले.
कल्याणेश्वर मंदिर, तेलंगखेडी
तेलंगखेडीचे शिवमंदिर प्राचीन मंदिर असून, शहरात प्रसिद्ध आहे. भोसल्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे स्वयंभू मंदिर असून, लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने, मोठ्या संख्येने भाविक आज दर्शनासाठी आले होते. सकाळी महाआरती करून, अभिषेक करण्यात आला. दिवसभर मृत्युंजय मंत्राचा जप सुरू होता. दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता, कुठलीही विपरीत घटना घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. मंगळवारी मध्यरात्री महानिशितकालमध्ये महापूजा होणार आहे.
अर्धनारीनटेश्वर मंदिर, मोक्षधाम
मोक्षधाम घाटावरील अर्धनारीनटेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव धार्मिक वातावरणात साजरा झाला. महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली. १९७७ मध्ये मोक्षधाम घाटावर अर्धनारीनटेश्वराच्या मूर्तीची स्थापना झाली. तेव्हापासून महाशिवरात्रीचा भव्य उत्सव येथे साजरा होतो. दोन दिवसीय या उत्सवात विविध कार्यक्रम होतात. मंगळवारी सकाळी पूजा झाल्यानंतर भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्रीला जागरणाचा कार्यक्रम झाला. लहान मुले, महिलांनीही आज मोक्षधाम घाटावर जाऊन दर्शन घेतले. या उत्सवानिमित्त मोक्षधाम घाटाचे वातावरण धार्मिक झाले होते.