शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

महाशिवरात्री जोड

By admin | Published: February 18, 2015 12:13 AM

पाताळेश्वर शिवमंदिर, महाल

पाताळेश्वर शिवमंदिर, महाल
महालातील पाताळेश्वर शिवमंदिर हे स्वयंभू आहे. भोसल्यांच्या काळात पाताळेश्वर प्रवेशद्वाराची निर्मिती करीत असताना शिवलिंगाचे दर्शन झाले होते. या मंदिराप्रति भाविकांची मोठी श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला शहराच्या बाहेरूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात. आज सकाळी शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला. सकाळपासूनच भाविकांची दर्शनाला सुरुवात झाली होती. रात्रीला महाआरती करण्यात आली. रात्रभर जागरणाचा कार्यक्रम झाला. मोठ्या संख्येने भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कल्याणेश्वर मंदिर, महाल
इक्षुरसात (उसाचा रस) लक्ष्मीचा वास असल्याने कल्याणेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीला इक्षुरसाचा अखंड अभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकातर्फे नि:शुल्क इक्षुरसाचा ग्लास अभिषेकासाठी देण्यात येत होता. सकाळी ११ वाजतापासून अभिषेकाला सुरुवात झाली. रात्री ११ ला अभिषेकाची समाप्ती झाली. यादरम्यान अखंड महारुद्राचा मंत्रोपच्चार सुरू होता. जवळपास ५० हजारावर भाविकांनी दिवसभरात दर्शन घेतले. प्रत्येक भाविकांना उपवासाच्या पदार्थांचा प्रसादही वितरित करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक मंडळ बालाजीनगर विस्तार
बालाजीनगर विस्तारमधील विश्वशांती मानव सेवाश्रमतर्फे आयोजित संत गजानन महाराज मंदिरातून महाशिवरात्रीनिमित्त भव्य पालखीचे आयोजन करण्यात येते. ज्येष्ठ नागरिक मंडळाचे मनोहर मोटघरे, विठ्ठलराव सांडे, गोविंदराव ढोक, दत्तू वाघाडे, विजय आडोकार, संजय धुर्वे, लक्ष्मण मानकर, अंबादास मानकर यांनी पालखीचे स्वागत केले. स्वागतासाठी बर्फाचे शिवलिंग साकारले होते. पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखीत सहभागी भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. टाळमृदंगाच्या गजरात पालखीने संपूर्ण परिसरात भ्रमण केले. मोठ्या संख्येने भाविक यात सहभागी होते.
शिवगौरी नागनाथ मंदिर, चंदननगर
चंदननगर येथील श्री शिवगौरी नागनाथ मंदिर सेवा ट्रस्टद्वारे महाशिवरात्री उत्सव धार्मिक वातावरणात करण्यात आला. सकाळी ६ वाजता शिवाभिषेक व महाआरती करण्यात आली. दुपारी भजनांचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २२ फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा साजरा होणार आहे. २२ ला आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. हभप प्रमोद हिवरे महाराजांचे गोपालकाल्याचे कीर्तन होईल.