शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

४५ बिल्डर्सना महारेराची कारणे दाखवा नोटीस; एकच बँक खाते अनेक प्रकल्पांशी संलग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 09:09 IST

महरेराने गृहनिर्माण प्रकल्पांची झाडाझडती सुरू केली असून, भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून एका प्रकल्पाचे खाते दुसऱ्या प्रकल्पाच्या बँक खात्याशी जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटकाव होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नोंदणीकृत गृहनिर्माण प्रकल्प व्यवस्थित पूर्ण व्हावा यासाठी एका नोंदणी क्रमांकाच्या प्रकल्पासाठी एकच बँक खाते असणे बंधनकारक आहे. मात्र, १७८१ गृहनिर्माण प्रकल्पांनी त्यांची बँक खाती एकापेक्षा जास्त प्रकल्पांशी जोडली आहेत. परिणामी महारेराने याची दखल घेत ४५ बिल्डरांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, उर्वरित प्रकल्पांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे.

महरेराने गृहनिर्माण प्रकल्पांची झाडाझडती सुरू केली असून, भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून एका प्रकल्पाचे खाते दुसऱ्या प्रकल्पाच्या बँक खात्याशी जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटकाव होईल. कारण आता तसे बदल संगणकीय प्रणालीत करण्यात आले आहेत. शिवाय आता बिल्डरने परस्पर खाते बदल करायचा प्रयत्न केल्यास तेही होणार नाही. कारण महारेराने नवीन आदेश काढून या बदलासाठी पूर्व परवानगी अत्यावश्यक केली आहे.

राज्यात लहान-मोठे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या सूक्ष्म संनियंत्रणासाठी महारेराने पावले उचललेली आहेत. प्रकल्पांशी संबंधित आर्थिक व्यवहारांचे सूक्ष्म संनियंत्रण महारेराने केले आहे. गेल्या आठवड्यात महारेराने ३१३ प्रकल्पांवर रेड फ्लॅग लावून त्यांची तपासणी सुरू केली आहे. या सर्व ३१३ प्रकल्पांनाही कारणे दाखवा नोटीस यापूर्वीच बजावण्यात आल्या आहेत. त्यांची छाननी सुरू आहे.बिल्डर्सने महारेराकडे सादर केलेल्या माहितीचा अभ्यास करून महारेराने अनियमितता अधोरेखित केली आहे. अनियमिततेची दखल घेत कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.